Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Rail Kaushal Vikas Yojana: रेल्वेमध्ये प्रशिक्षण घेऊन सुरू करा स्वतःचा व्यवसाय; आलीय आत्मनिर्भर होण्याची संधी

Please wait..

मुंबई : देशातील तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण, भारतीय रेल्वेने तिच्या रेल कौशल विकास योजना (RKVY) प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पात्र उमेदवारांकडून (महिला / पुरुष) अर्ज मागवले आहेत. हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत आहे. या प्रशिक्षणासाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार http://www.railkvy.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. ( Rail Kaushal Vikas Yojana 2022 Online Form Know How To Apply News)

Advertisement

Advertisement
Loading...

रेल कौशल विकास योजना (Rail Kaushal Vikas Yojana): अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रेल कौशल विकास योजनेसाठी (RKVY) अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रेल्वेने अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल 2022 ठेवली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ असल्याने, इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी त्यांचे अर्ज पूर्ण करावेत. रेल्वे कौशल विकास योजनेअंतर्गत रेल्वे मंत्रालयातर्फे तरुणांसाठी अखिल भारतीय स्तरावरील नियुक्त केंद्रांवर अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो. हा विविध ट्रेडमधील प्रवेश स्तरावरील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आहे. या अंतर्गत रेल्वे मंत्रालयात एसी मेकॅनिक, कारपेंटर, सीएनएसएस (कम्युनिकेशन नेटवर्क अँड मॉनिटरिंग सिस्टीम), बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर, काँक्रिटिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स), मशीनिस्ट, रेफ्रिजरेशन आणि एसी. , तंत्रज्ञ मेकॅट्रॉनिक्स , ट्रॅक लेइंग, वेल्डिंग, बार आणि बेंडिंग ऑफ IT आणि S&T चे प्रशिक्षण दिले जाईल. या माध्यमातून युवकांना रोजगार मिळून स्वयंरोजगार (Self Employement) सुरू करण्यास मदत होणार आहे.

Advertisement
  • प्रशिक्षण कार्यक्रमाशी संबंधित महत्वाची माहिती :
  • प्रशिक्षण वेळ- मे 2022
  • बॅच क्रमांक- 8वी
  • कामाचा कालावधी – 18 दिवस
  • निवड प्रक्रिया – 10वीच्या गुणांच्या आधारे.
  • वयोमर्यादा- किमान 18 वर्षे आणि कमाल 35 वर्षे.

रेल कौशल विकास योजना: अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे : स्वाक्षरी आणि छायाचित्र, 10वी गुणपत्रिका, वैध फोटो ओळखपत्र, 10 रुपयांच्या गैर-न्यायिक स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, आदि. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट railkvy.indianrailways.gov.in वर जाऊन आणि सर्व आवश्यक सूचनांचे पालन करून अर्ज करू शकतात. अर्ज केल्यानंतर, उमेदवारांनी अर्ज डाउनलोड करावा आणि पुढील गरजांसाठी त्याची प्रिंटआउट घ्यावी.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply