गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद (Ghaziabad) जिल्ह्यातील एका कचराकुंडीला आग लागल्याने त्याच्याजवळ असणाऱ्या गोशाळेत ठेवलेल्या 38 गायी जळून खाक झाल्या. एका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, इंदिरापुरम पोलीस स्टेशन हद्दीतील कानवणी गावातील गोठ्यात रविवार-सोमवार मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आगीची घटना घडली.
श्री कृष्णा गोशाळेचे संचालक सूरज पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची घटना घडली त्यावेळी तेथे सुमारे 150 गायी होत्या. शेजारील कचराकुंडीला आग लागल्याने आगीच्या ज्वाला गोठ्यापर्यंत पोहोचल्याची.
जिल्हा दंडाधिकारी राकेश कुमार सिंह यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. “प्राथमिक तपासणीनुसार आगीमुळे 15 ते 20 गुरांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती गोळा करून तपास सुरू आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
गाझियाबादचे पोलीस प्रमुख मुनिराजजीही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर इंदिरापुरमचे मंडळ अधिकारी अभय कुमार मिश्रा यांनी सांगितले की, या घटनेत एकूण 38 गायींचा मृत्यू झाला आहे. मिश्रा हे या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे सदस्य आहेत.