Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

इम्रानला झटका: सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय; आता पाकिस्तानचा इतिहास बदलणार?

दिल्ली – गुरुवारी ऐतिहासिक निर्णय घेत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने (Pakistan Supreme court) इम्रान खान (Imran Khan) यांना मोठा झटका देत राष्ट्रपतींचा आदेश झुगारून पाकिस्तानची नॅशनल असेंब्ली बहाल केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 9 एप्रिल रोजी पुन्हा संसदेत मतदान होणार आहे. आता इम्रान खान यांचा अविश्वास ठराव हरला तर, पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानाची त्यांच्या पदावरून हकालपट्टी होईल. जाणून घ्या, संसदेत अविश्वास ठराव हरल्यानंतर इम्रान खान पंतप्रधानपदावरून पायउतार झाले तर काय होईल.

Advertisement

गुरूवारी पाकिस्तानच्या इतिहासातील मोठा निर्णय घेत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, 3 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या संसदेतील अविश्वास प्रस्ताव रद्द करणे हे संविधानाच्या विरोधात आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की पाकिस्तान संसद पूर्ववत केली जाईल आणि 9 एप्रिल रोजी संसद पुन्हा अविश्वास प्रस्तावावर मतदान करेल. जर हा प्रस्ताव संसदेत यशस्वी झाला, तर पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधानांविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव यशस्वी होईल.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

यापूर्वी जेव्हा अविश्वास प्रस्ताव आणला गेला होता
पाकिस्तानच्या राजकीय इतिहासावर नजर टाकली तर याआधी 1 नोव्हेंबर 1989 रोजी माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि 2006 मध्ये माजी पंतप्रधान शौकत अझीझ यांच्या विरोधात नॅशनल असेंबलीमध्ये अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र, दोन्ही वेळा विरोधकांना ठराव मंजूर करण्यात अपयश आले. आता जर इम्रान खान 9 एप्रिल रोजी संसदेतील अविश्वास प्रस्ताव हरले तर पाकिस्तानच्या राजकारणाच्या इतिहासात पंतप्रधान अविश्वास प्रस्ताव गमावण्याची ही पहिलीच वेळ असेल.

Advertisement

इम्रानचे काय होईल
9 एप्रिल रोजी पाकिस्तान संसदेत अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयकडे सध्या 142 सदस्य आहेत, तर विरोधी पक्षांना 199 सदस्यांचा पाठिंबा आहे. त्याचवेळी विधानसभेत अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी विरोधकांना 172 खासदारांची गरज आहे. अशावेळी अविश्वास ठरावावर मतदान झाल्यास इम्रान खान पंतप्रधानपद गमावतील, असे दिसते. अविश्वास प्रस्ताव यशस्वी झाल्यास, राष्ट्रपती नॅशनल असेंब्लीचे एक अधिवेशन बोलवतील, ज्यामध्ये सभागृहाच्या नवीन नेत्याची निवड करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply