Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ वादग्रस्त निर्णयानंतर; मोदी करणार पहिल्यांदाच कश्मीरचा दौरा; जाणुन घ्या संपूर्ण कार्यक्रम

दिल्ली – कलम 370 (Article 370) रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरला(Jammu and Kashmir) भेट देणार आहेत. पीएम मोदींची ही भेट 24 एप्रिल रोजी होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव अशोक कौल यांनी ही माहिती दिली.

Advertisement

कौल यांनी असेही सांगितले की या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींना काश्मिरी पंडितांच्या प्रतिनिधींसोबत भेटण्याचा प्रयत्न केला जात आहे जेणेकरून ते स्वतः त्यांच्या समस्या पंतप्रधानांना सांगू शकतील. याआधी मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरला दहशतवादाच्या राजधानीपासून पर्यटनाची राजधानी बनवले आहे.

Advertisement

चुग म्हणाले की, पीएम मोदींमुळे घाटीमध्ये दहशतवादी घटनांमध्ये घट झाली आहे. भाजपची विचारसरणी स्पष्ट आहे की जो कोणी सामान्य लोकांवर शस्त्र उचलेल तो स्वतःची कबर खोदेल. माध्यमांशी बोलताना चुग म्हणाले की, खोऱ्यातून दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी आणि तेथे न्याय्य विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करणे हे आमचे स्वप्न आहे आणि आम्ही त्या दिशेने प्रयत्न करत राहू.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सवर हल्ला करताना चुग म्हणाले की हे दोन्ही पक्ष नेहमीच काश्मीरला जम्मूपासून वेगळे करतात. चीन आणि पाकिस्तानशी मैत्रीचे बोलून ते लोकांची दिशाभूल करतात. विषारी विचारधारा अजूनही त्यांच्यात आहे कारण ती त्यांच्या डीएनएमध्ये आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply