Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

याला काय अर्थ: स्वतःची खुर्ची धोक्यात पाहून इम्रान खानने भारतावर लावला मोठा आरोप; म्हणाले..

दिल्ली – हिंदीत एक अतिशय प्रसिद्ध म्हण आहे. खिसियानी बिल्ली खंभा नोचे… म्हणजे स्वतःच्या अपयशासाठी इतरांना दोष देणे. असेच काहीसे पाकिस्तानात (Pakistan) घडत आहे. पाकिस्तान सरकारमधील माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhary) यांनी इम्रान खान (Imran Khan) सरकार पाडण्याच्या प्रयत्नामागे भारताचा हात असल्याचे सांगितले आहे.

Advertisement

फवाद चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, नवाझ शरीफ लंडनमध्ये बसून पाकिस्तानातील इम्रान खान सरकार पाडू इच्छित आहेत. फवाद चौधरी पुढे म्हणाले की, नवाझ शरीफ यांचे भारतासोबतचे संबंध कसे आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. नवाझ शरीफ यांच्या भारत आणि इस्रायलच्या लोकांशी झालेल्या भेटी लपून राहिलेल्या नाहीत.इतकंच नाही तर फवाद चौधरी यांनी पाकिस्तानी मीडियावरही प्रश्न उपस्थित करत इम्रान सरकार पाडण्याच्या कटात पाकिस्तानी मीडियाचे काही लोकही सहभागी असल्याचं म्हटलं आहे.

Advertisement

विशेष म्हणजे पाकिस्तानातील इम्रान खान सरकार पडणे जवळपास निश्चित मानले जात आहे. इम्रान खान गुरुवारी संध्याकाळी उशिरा देशाच्या नावाने संबोधितही करू शकतात. या भाषणात इम्रान खान पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. बंडखोर खासदारांवर कठोर कारवाई करणार असल्याचेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

पाकिस्तानातील राजकीय परिस्थितीवर एक नजर टाकली तर, काळजीवाहू पंतप्रधान वगळता पाकिस्तानात एकूण 19 पंतप्रधान झाले आहेत. मोठी गोष्ट म्हणजे या 19 पैकी फक्त तीनच पंतप्रधान आहेत जे चार वर्षांहून अधिक काळ पंतप्रधानपदावर राहिले आहेत. यामध्ये लियाकत अली खान, नवाझ शरीफ आणि युसूफ रझा गिलानी यांच्या नावांचा समावेश आहे. नवाझ शरीफ हे तीन टर्ममध्ये नऊ वर्षे पाकिस्तानचे पंतप्रधान होते, तर बेनझीर भुट्टो या दोन टर्ममध्ये साडेपाच वर्षे पाकिस्तानच्या पंतप्रधान होत्या.

Advertisement
Advertisement

Leave a Reply