Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘त्यांनी’ केला सीएम केजरीवाल यांच्या घरावरच हल्ला..! पहा नेमके काय आहे प्रकरण

दिल्ली : देशात एकीकडे वाढती महागाई सामन्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. अशावेळी एका चित्रपटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाने देशातील सामाजिक वातावरण तापवले आहे. त्यामुळे बेरोजगारी, अनारोग्य आणि महागाई हे मुद्दे अपोआप मागे पडले आहेत. अशावेळी आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करण्याचे ‘महान कृत्य’ करून दाखवले आहे. (Bjp Yuva Morcha Attack On Kejriwal House Tejasvi Surya Caught On Camera Watch Cctv)

Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर बुधवारी हल्ला करून तोडफोड करण्यात आली. काश्मीर फाईल्स या सिनेमावरील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते निदर्शने करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाच्या सुमारे 150-200 कार्यकर्त्यांनी सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केले. यातील काही आंदोलक 12.51 मिनिटांनी बॅरिकेड तोडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून येते की, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नकार देऊनही आंदोलक घराच्या गेटपर्यंत आले आणि दरवाजावर रंग फेकले. यावेळी येथे लावलेला सीसीटीव्ही कॅमेराही तोडण्यात आला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्याही सीसीटीव्हीत दिसत आहे.

Loading...
Advertisement

माहितीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तेजस्वी सूर्यासह 70 जणांना ताब्यात घेतले. मुख्यमंत्र्यांवरील हल्ल्यानंतर ‘आप’ने मोठा आरोप केला की पंजाबमधील पराभवामुळे भाजप नाराज झाला असून केजरीवाल यांची हत्या व्हावी, अशी इच्छा आहे. ‘आप’ला फटकारताना तेजस्वी सूर्या म्हणाले की, ‘देशातील हिंदूंचा अपमान केल्याबद्दल केजरीवाल यांना माफी मागावी लागेल आणि जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत युवा मोर्चा त्यांना सोडणार नाही. देशातील हिंदूंचा अपमान करणारे केजरीवाल आज आपल्याला समाजकंटक आणि काश्मिरी हिंदूंची कत्तल करणारे दहशतवादी प्रिय आहेत.’

Advertisement
Advertisement

Leave a Reply