पुणे : महाराष्ट्र संयुक्त प्रवेश परीक्षा MHT CET 2022 (MHT CET 2022 Exam Dates) याचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार MHT CET 2022 परीक्षा 3 जून ते 12 जून 2022 या कालावधीत घेण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून ही माहिती दिली. त्यानंतर परीक्षेला बसणारे उमेदवार mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन पूर्ण वेळापत्रक (MHT CET 2022 शेड्यूल) तपासू शकतात असेही कळवण्यात आलेले आहे.
उदय सामंत यांनी ट्विट केले की, ‘शैक्षणिक सत्र 2022 साठी उच्च शिक्षण विभागाची सीईटी परीक्षा 3 जून ते 10 जून, तंत्रशिक्षण विभागाची 11 जून ते 28 जून आणि कला विभागाची 12 जून रोजी होणार आहे.’ परीक्षेचे माहितीपत्रक, वेळापत्रक, अभ्यासक्रम mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही शिक्षणमंत्र्यांनी दिली. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या गटांसाठी ही परीक्षा घेतली जाईल. BE, BTech, BPharm किंवा D Pharma मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी त्यात सामील होतात. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमावर आधारित MHT CET मध्ये प्रश्न विचारले जातील. ज्यामध्ये इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमाला 20 टक्के वेटेज आणि 12वीच्या अभ्यासक्रमाला 80 टक्के वेटेज असेल.
शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.03 जून ते 10 जून, 2022, तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.11 जून ते 28 जून, 2022 तसेच कला शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.12 जून, 2022 रोजी घेण्यात येणार आहेत.
Advertisement— Uday Samant (@samant_uday) March 25, 2022
Advertisement