Take a fresh look at your lifestyle.

Election Special : ‘त्या’ 23 मतदारसंघात भाजप करणार खास सर्वेक्षण; महत्वाच्या कारणांचा घेणार शोध..

मुंबई : उत्तराखंडमध्ये भाजपला 23 मतदारसंघात दणदणीत पराभव स्वीकारावा लागला होता. आता या ठिकाणी पराभव का झाला, काय कारण होते, की या मतदारसंघात पक्षाता पराभव झाला, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भाजपने एक खास प्लान तयार केला आहे. त्यानुसार या पराभवाचा आढावा घेण्याची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. या जागांपैकी खटिमा विधानसभा जागा आहे, ज्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी निवडणुकीत पराभूत झाले. हे नेते 1 एप्रिल रोजी विधानसभा मतदारसंघांचा अहवाल राज्य नेतृत्वाला सादर करतील.

Advertisement

भाजपने प्रदेश सरचिटणीस सुरेश भट्ट, कुलदीप कुमार तसेच पुष्कर काला, विनय रुहेला, डॉ. देवेंद्र भसीन, वीरेंद्र बिश्त, अनिल गोयल, मयंक गुप्ता, सुरेश जोशी, बलवंत सिंग भोरियाल, खिलेंद्र चौधरी, डॉ. केदार जोशी या नेत्यांना ही जबाबदारी दिली आहे. हे सर्व नेते 29 मार्चपासून संबंधित विधानसभा मतदारसंघात राहणार आहेत.

Advertisement

स्थानिक नेत्यांबरोबर झालेल्या चर्चेच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात येणार आहे. प्रदेश सरचिटणीस कुलदीप कुमार यांनी सांगितले की, राज्य नेतृत्वाने अशा सर्व विधानसभा जागांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे जिथे पक्षाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेल्या 23 जागांपैकी सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ खटिमा आहे. मुख्यमंत्री पुष्कर धामी येथून निवडणूक लढत होते. काही मतदारसंघात तर पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली, त्यामुळे अश कोणती कारणे होती, याचा शोध घेण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.

Advertisement

भाजप-काँग्रेसला जोरदार झटका..! ‘या’ राज्यातील निवडणुकीत दणदणीत पराभव; जाणून घ्या, अपडेट राजकारणाचे..

Advertisement
Advertisement

Leave a Reply