Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भाजप-काँग्रेसला जोरदार झटका..! ‘या’ राज्यातील निवडणुकीत दणदणीत पराभव; जाणून घ्या, अपडेट राजकारणाचे..

दिल्ली : देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला. भाजपने पंजाब वगळता चार राज्यात पुन्हा सत्ता मिळवली. मात्र, ओडिशा या राज्यात दोन्ही पक्षांना जोरदार झटका बसला आहे. ओडिशा राज्यातील नागरी निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी बिजू जनता दलाने (बीजेडी) जबरदस्त विजय मिळवला आहे. बीजेडीने ओडिशातील 108 शहरी स्थानिक संस्था परिषदांपैकी 95 जागा जिंकल्या आहेत.

Advertisement

दुसरीकडे भाजपला फक्त सहा, काँग्रेसला चार आणि अपक्षांना तीन जागा मिळाल्या. ओडिशात, भुवनेश्वर, कटक आणि ब्रह्मपूर महानगरपालिकांसह 109 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कडेकोट बंदोबस्तात गुरुवारी मतदान झाले होते. राज्यातील 47 नगरपालिका, 59 क्षेत्र परिषदा आणि तीन महानगरपालिकांमध्ये सकाळी 8 वाजता मतदान सुरू झाले आणि ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालले.

Advertisement

या निवडणुकीत 6411 उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी 569 अध्यक्ष/महापौर पदासाठी, तर 5842 नगरसेवक/कॉर्पोरेट जागांसाठी निवडणूक रिंगणात होते. ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी ओडिशाच्या नागरी निवडणुकीत भरभरून पाठिंबा दिल्याबद्दल ओडिशातील सर्व जनतेचे आभार मानले आहेत. शुक्रवारी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जवळपास दोन वर्षांनंतर ओडिशा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थिती दर्शवली. यावेळी विरोधकांनी सत्ताधारी पक्ष आणि मुख्यमंत्र्यांना घेरले. पटनायक कोविड-19 संकटाच्या काळात डिजिटल माध्यमातून अधिकृत बैठका आणि विधानसभेच्या कामकाजात सहभागी होत होते. परंतु, विरोधकांनी आरोप केला की ते सभागृहाच्या बैठकांना उपस्थित राहिले नाहीत.

Loading...
Advertisement

महागाई रोखण्यासाठी काँग्रेसचा प्लान..! देशभरात सुरू करणार ‘हे’ मोठे अभियान; पहा, मोदी सरकारला ‘कसे’ घेरणार..

Advertisement

काँग्रेसचा मोर्चा आता गुजरातकडे..! भाजप-‘आम आदमी’ ला रोखण्यासाठी तयार केलाय खास प्लान..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply