Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. ‘या’ कारणाने ‘द कपिल शर्मा शो’टीव्हीवर दिसणार नाही; चाहते झाले नाराज

मुंबई- ‘The Kashmir Files’ चित्रपटाचा प्रमोशन न केल्याने झालेल्या वादामुळे ‘द कपिल शर्मा शो’ला (The Kapil Sharma Show) खूप विरोध झाला होता. आता बातमी अशी आहे की आता हा शो लवकरच बंद होणार आहे. जर असे झाले तर तुम्ही कपिल शर्मा शो पाहू शकणार नाही.

Advertisement

पण ‘द काश्मीर फाइल्स’च्या प्रमोशनच्या वादामुळे हे सर्व घडत आहे, असा तुमचा विचार असेल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. खरंतर कपिल शर्माने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करून त्याच्या अमेरिका-कॅनडा दौऱ्याची घोषणा केली आहे.

Advertisement

कपिल शर्माने त्याच्या इंस्टाग्रामवर लिहिले की, 2022 मध्ये माझ्या यूएस-कॅनडा दौऱ्याची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. लवकरच भेटू. हा दौरा 11 जूनपासून सुरू होणार असून 3 जुलैपर्यंत चालणार आहे.

Loading...
Advertisement

शो बंद करण्याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही मात्र, कपिलचा शो बंद करण्याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की लवकरच हा शो ऑफ एअर होणार आहे. कॉमेडियन या कॉमेडी शोमधून थोडा ब्रेक घेणार आणि नंतर लवकरच परतणार असल्याचं बोललं जात आहे.

Advertisement

खरेदिवाला सर्वांसाठी..! ऑफर आणि लव्ह एनकॅशसाठी आजच Kharediwala वर जाऊन आपल्या प्रियजनांना भेटवस्तू पाठवा

Advertisement

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, यूएस-कॅनडा टूर व्यतिरिक्त कपिलकडे इतर काही असाइनमेंट्स देखील आहेत. त्यामुळे त्याने छोटा ब्रेक घ्यायचा आणि त्यानंतर काही महिन्यांनी नवीन सीझन घेऊन परतण्याचा विचार केला आहे. कपिल शर्मा शो दर आठवड्याला शनिवार आणि सोमवारी प्रसारित होतो. यापूर्वी हा शो एकदा बंद झाला होता. नंतर ते पुन्हा सुरू झाला होता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply