योगी ॲक्शन मोडमध्ये; मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना दिला ‘हा’ मोठा टार्गेट
दिल्ली – नुकताच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (Uttar Pradesh elections) निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये पुन्हा एकदा यूपीच्या जनताने मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथला (Yogi Adityanath) आपली पसंती दिली आहे.
योगी आदित्यनाथ नाही शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे आणि आज पासुन काम सुरू केला आहे. कामाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ॲक्शन मोडमध्ये दिसले. सकाळी पत्रकार परिषद घेऊन मोफत रेशनची वेळ वाढवण्याची घोषणा केली. यानंतर त्यांनी सर्व अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना टार्गेट दिले आहे. सीएम योगी म्हणाले की, 6 महिने, 1 वर्ष आणि 5 वर्षांचे लक्ष्य निश्चित केल्यानंतर एक सादरीकरण करा.
सीएम योगी म्हणाले की, प्रत्येक विभागाने अर्ध्या तासाचे सादरीकरण करावे. सीएम योगी म्हणाले की, मागील सरकारमध्ये स्पर्धा इतरांच्या कामाशी होती. मात्र यावेळी त्यांना त्यांच्या स्वत:च्या गेल्या टर्मपेक्षाही चांगली कामगिरी करायची आहे. चांगले केले, म्हणून परत आले पण आता मला आणखी चांगले करायचे आहे. जनतेने विश्वास व्यक्त केला आहे, तो पूर्ण करायला हवा.
खरेदिवाला सर्वांसाठी..! ऑफर आणि लव्ह एनकॅशसाठी आजच Kharediwala वर जाऊन आपल्या प्रियजनांना भेटवस्तू पाठवा
मुख्यमंत्र्यांच्या सूचना फायली टांगू नयेत. लोककल्याण संकल्पपत्रातील आश्वासनांची अंमलबजावणी करावी लागेल आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.