मुंबई – आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) संघाने मोठा निर्णय घेत संघाची कमान रवींद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) सोपवली आहे. चेन्नई हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. महेंद्रसिंग धोनीच्या (M.S.Dhoni) नेतृत्वाखाली सीएसकेने चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. आता धोनीने CSK चे कर्णधारपद सोडले आहे. त्याच्या जागी अष्टपैलू रवींद्र जडेजा कर्णधार झाला आहे. संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आता यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळणार आहे. मात्र, जोपर्यंत तो आयपीएलमध्ये खेळत आहे तोपर्यंत तो मार्गदर्शकच्या भूमिकेत राहील. कर्णधारपद मिळाल्यानंतर जडेजानेही हे मान्य केले आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार झाल्यानंतर जडेजाने आपल्या पहिल्या वक्तव्यात सांगितले की, मला चांगले वाटत आहे, परंतु माझ्यावर एका मोठ्या खेळाडूची जबाबदारी देण्यात आली आहे, जी भरणे सोपे नाही. माही भाईने कर्णधार म्हणून जो वारसा निर्माण केला आहे. मला त्याला पुढे न्यायचे आहे. जडेजा 2012 पासून चेन्नई सुपर किंग्जशी जोडला गेला आहे. त्याने चेन्नईसाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. तो गोलंदाजी आणि धडाकेबाज फलंदाजीत माहिर आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 15 मध्ये त्यांचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळणार आहे. आता हा सामना सुरू होण्यास 24 तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, अशा स्थितीत दोन्ही संघांचे खेळाडू त्यांचे शेवटचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. चेन्नई सुपर किंग्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा सराव करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये जडेजाही धोनीशी बोलताना दिसत आहे.
खरेदिवाला सर्वांसाठी..! ऑफर आणि लव्ह एनकॅशसाठी आजच Kharediwala वर जाऊन आपल्या प्रियजनांना भेटवस्तू पाठवा
जडेजा म्हणाला की त्याला काळजी करण्याची गरज नाही, माही भाई त्याच्यासोबत आहे. त्यांना काही अडचण असेल तर माही भाईकडे जाऊन प्रश्न विचारेल. यासोबतच जडेजाने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. जडेजा सीएसके संघाचा तिसरा कर्णधार असेल. त्याच्या आधी धोनी आणि सुरेश रैना यांनी चेन्नईचे कर्णधारपद सांभाळले आहे.
जडेजाने सीएसकेसाठी 146 सामन्यांत 109 विकेट घेतल्या आहेत आणि 1480 धावा केल्या आहेत. यावेळी त्याच्या नेतृत्वाखाली संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल. जडेजाने काही चेंडूतच सामन्याचा मार्ग फिरवला आहे. खाली क्रमवारीत फलंदाजीसाठीही तो प्रसिद्ध आहे.