Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

उत्तर प्रदेशचा उपमुख्यमंत्री कोण..? ; ‘या’ तीन उमेदवारांची नावे आहेत आघाडीवर; जाणून घ्या..

दिल्ली : 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमतासह सत्तेत परतणाऱ्या भाजपने आदित्यनाथ यांच्या रूपाने विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची पुन्हा निवड केली आहे. आज (25 मार्च) दुपारी आदित्यनाथ मंत्र्यांसह शपथ घेतील. योगी आदित्यनाथ शुक्रवारी सुमारे चार डझन मंत्र्यांसह शपथ घेणार आहेत. त्यांच्याकडे दोन उपमुख्यमंत्रीही आहेत. एकीकडे केशव प्रसाद मौर्य यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे डॉ. दिनेश शर्मा यांच्याऐवजी ब्रजेश पाठक यांचे नाव समोर आले आहे. ब्रजेश पाठक यांना उपमुख्यमंत्री केले जाऊ शकते. यावेळीही दोन उपमुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

Advertisement

आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 50 सदस्य असतील. आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी कोणाचीही भेट घेणार नाहीत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर मंत्रिमंडळाबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. आता उपमुख्यमंत्री कोण होणार याचीच सर्वाधिक चर्चा आहे. केशव प्रसाद मौर्य हे निवडणुकीत पराभूत झाले आहेत, त्यामुळे त्यांचा दावा कमकुवत असल्याचे सांगितले जात होते, त्यामुळे डॉ. दिनेश शर्मा यांना संघटनेत पाठवल्याची चर्चा होती.

Advertisement

उत्तराखंडमध्ये निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेले पुष्करसिंह धामी यांना भाजपने मुख्यमंत्री केले. त्यानंतर उत्तर प्रदेशात केशव प्रसाद मौर्य यांच्याबाबतही हाच फॉर्म्यूला भाजपकडून वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या उपमुख्यमंत्री पदासाठी ब्रजेश पाठक यांचे नाव समोर येत आहे. आता डॉ. दिनेश शर्मा की ब्रजेश पाठक या दोघांपैकी कोण उपमुख्यमंत्री होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Advertisement

दरम्यान, अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी जयकुमार जॅकी, संदीप सिंग, गिरीश चंद्र यादव, बलदेव सिंग औलख, मोहसीन रझा, अतुल गर्ग, रवींद्र जैस्वाल, अशोक कटारिया, कपिल देव अग्रवाल, अनिल राजभर, भूपेंद्र चौधरी, आशुतोष टंडन, लक्ष्मीनारायण चौधरी, ब्रजेश पाठक, जय प्रताप सिंह, श्रीकांत शर्मा, सिद्धार्थनाथ सिंह, सतीश महाना, सुरेश खन्ना आणि स्वतंत्रदेव सिंह यांना संधी दिली जाऊ शकते. याशिवाय माजी मंत्री जीएस धर्मेश, रमाशंकर पटेल, दिनेश खाटिक, संजीव गोंड यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळू शकते.

Loading...
Advertisement

त्याचबरोबर मित्रपक्षांनाही मंत्रिमंडळात सहभागी करुन घेतले जाणार आहे. अपना दल (एस)चे आशिष पटेल, निषाद पक्षाचे अध्यक्ष संजय निषादही मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. निषाद पक्ष आणि अपना दलातूनही एक राज्यमंत्री बनवला जाऊ शकतो. याबरोबरच नव्या चेहऱ्यांबद्दल सांगितले तर अरविंद कुमार शर्मा, असीम अरुण, राजेश्वर सिंग, अश्वनी त्यागी, राजेश त्रिपाठी, ब्रजेश सिंह रावत, दयाशंकर सिंह, राजेश चौधरी, दीनानाथ भास्कर यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते.

Advertisement

केजरीवाल संतापले..! म्हणाले, तर आम्ही राजकारणच सोडून देऊ; पहा, काय दिलेय भाजपला आव्हान..?

Advertisement

UP New Cabinet : उत्तर प्रदेशच्या नव्या मंत्र्यांची नावे फायनल.. पहा, कॅबिनेटमध्ये कोण होणार मंत्री..

Advertisement
Advertisement

Leave a Reply