Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्यामुळेच’ ठाकरे सरकार आमदारांना घर देणार; भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली जोरदार टीका..

पुणे : राज्य सरकारने आमदारांबाबत केलेल्या एका घोषणेचे राज्यातील राजकारणात जोरदार पडसाद उमटले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्ष भाजपने जोरदार टीका केली आहे. आमदार पळून जातील आणि सरकार पडेल म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आधिवेशना दरम्यान प्रसारमाध्यमांबरोबर त्यांनी संवाद साधला. यावेळी राज्य सरकारच्या धोरणांवर त्यांनी टीका केली.

Advertisement

ते म्हणाले, की आमदारांना घर कशाला हवे आहे. कुणी आमदार व्हायला नारळ दिला नव्हता. मी म्हणतो घर कशाला हवे. मुळात महाविकास आघाडीचे आमदार फुटू नयेत म्हणून ही घोषणा सरकारने केली आहे. दोन कोटींचा आमदार निधी कोरोना असतानाही चार कोटी केला, आता पाच कोटी केला. ड्रायव्हरचे, सहाय्यकांच्या पगारात वाढ केली. त्यात आता घरे दिली जाणार आहेत. कशासाठी घरे पाहिजेत, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Loading...
Advertisement

माझे मुंबईत घर नाही. पण तरीही हे पैसे तुम्ही शेतकऱ्यांना, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना द्या यासाठी मी आग्रही असेन. आमदार व्हा म्हणून कुणी नारळ किंवा निमंत्रण दिले नव्हते की तुम्ही आमदार व्हा मग घर मिळेल, पाच कोटी मिळतील. त्यामुळे आमदारांचा रोष सहन करत मी हे योग्य नसल्याचे सांगत आहे असेही पाटील यांनी स्पष्ट केले. त्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनीही या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. एकूणच, राज्य सरकारच्या या घोषणेमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. राज्य सरकारवर टीका करण्याची आणखी एक संधी विरोधी पक्षांना यानिमित्ताने मिळाली आहे.

Advertisement

केंद्रीय मंत्री दानवेंच्या ‘त्या’ दाव्याने उडालीय खळबळ.. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही दिलेय जोरदार प्रत्युत्तर..

Advertisement
Advertisement

Leave a Reply