UP New Cabinet : उत्तर प्रदेशच्या नव्या मंत्र्यांची नावे फायनल.. पहा, कॅबिनेटमध्ये कोण होणार मंत्री..
दिल्ली : आज उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ आदित्यनाथ घेणार आहेत. त्याचवेळी आणखीही काही आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात कुणाला संधी द्यायची, याची यादी भाजप नेतृत्वाने तयार केली आहे. त्यानुसार कोण आमदार शपथ घेतील हे स्पष्ट होणार आहे. नव्या मंत्रिमंडळात कोण असेल याबाबत राज्यात मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात युवा, महिला आणि अनुभवी नेत्यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवे मंत्रिमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथ घेणार आहे. मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधण्याचाही प्रयत्न केला जाईल. आज मंत्रिमंडळात 45 ते 47 मंत्री शपथ घेऊ शकतात, असे मानले जात आहे. यामध्ये 24 कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार असलेले 10 पेक्षा अधिक राज्यमंत्री आणि सुमारे 12 राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो. मंत्रिमंडळात 15 हून अधिक नवे चेहरेही असू शकतात. पक्ष यावेळी तरुण चेहऱ्यांनाही संधी देऊ शकतो. त्याचबरोबर यावेळी मंत्रिमंडळात महिलांचा सहभाग वाढू शकतो.
अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी जयकुमार जॅकी, संदीप सिंग, गिरीश चंद्र यादव, बलदेव सिंग औलख, मोहसीन रझा, अतुल गर्ग, रवींद्र जैस्वाल, अशोक कटारिया, कपिल देव अग्रवाल, अनिल राजभर, भूपेंद्र चौधरी, आशुतोष टंडन, लक्ष्मीनारायण चौधरी, ब्रजेश पाठक, जय प्रताप सिंह, श्रीकांत शर्मा, सिद्धार्थनाथ सिंह, सतीश महाना, सुरेश खन्ना आणि स्वतंत्रदेव सिंह यांना संधी दिली जाऊ शकते. याशिवाय माजी मंत्री जीएस धर्मेश, रमाशंकर पटेल, दिनेश खाटिक, संजीव गोंड यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळू शकते.
त्याचबरोबर मित्रपक्षांनाही मंत्रिमंडळात सहभागी करुन घेतले जाणार आहे. अपना दल (एस)चे आशिष पटेल, निषाद पक्षाचे अध्यक्ष संजय निषादही मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. निषाद पक्ष आणि अपना दलातूनही एक राज्यमंत्री बनवला जाऊ शकतो. याबरोबरच नव्या चेहऱ्यांबद्दल सांगितले तर अरविंद कुमार शर्मा, असीम अरुण, राजेश्वर सिंग, अश्वनी त्यागी, राजेश त्रिपाठी, ब्रजेश सिंह रावत, दयाशंकर सिंह, राजेश चौधरी, दीनानाथ भास्कर यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते.
केजरीवाल संतापले..! म्हणाले, तर आम्ही राजकारणच सोडून देऊ; पहा, काय दिलेय भाजपला आव्हान..?
काँग्रेसचा मोर्चा आता गुजरातकडे..! भाजप-‘आम आदमी’ ला रोखण्यासाठी तयार केलाय खास प्लान..