दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना पश्चिम बंगालमधील कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 29 मार्चला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. अभिषेक हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पुतण्याही आहे.
पश्चिम बंगालमधील कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ED अधिकाऱ्यांनी अभिषेक बॅनर्जी यांना पुन्हा एकदा कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. याआधी सोमवारी अभिषेक दिल्लीतील केंद्रीय एजन्सीसमोर हजर झाला होता. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे आठ तास अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी केली. बॅनर्जी सकाळी 11 च्या सुमारास मध्य दिल्लीतील तपास संस्थेच्या नवीन कार्यालयात दाखल झाले आणि रात्री 8 वाजण्याच्या आधी तेथून निघून गेले.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अभिषेकचे बयान नोंदवण्यात आले होते आणि त्याला तपासकर्त्यांनी गोळा केलेले काही “पुरावे” समोर आले होते. ईडी कार्यालयातून बाहेर पडताना, खासदार म्हणाले की ते “कायद्याचे पालन करणारे नागरिक आहेत आणि म्हणूनच त्यांनी तपासात सहकार्य केले आहे”.