उत्तर प्रदेशचा उपमुख्यमंत्री कोण होणार ? ; आज मिळणार ‘या’ प्रश्नाचे उत्तर.. पहा, काय सुरू आहे राजकारण
मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये आज आदित्यनाथ सरकारचा शपथविधी होणार आहे. भाजप (BJP) विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आदित्यनाथ यांची नेतेपदी निवड होणार आहे. तसेच राज्याचा उपमुख्यमंत्री कोण असेल, या प्रश्नाचेही उत्तर मिळणार आहे. केंद्रीय पर्यवेक्षक अमित शहा (Amit Shah) आणि सह-पर्यवेक्षक रघुवर दास यावेळी उपस्थित राहणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.
भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक गुरुवारी (24 मार्च) दुपारी 4 वाजता होणार आहे. मात्र, बुधवारपासूनच आमदार लखनऊमध्ये दाखल होत आहेत. सर्व आमदारांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह आणि संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील बन्सल यांचीही भेट घेतली. अनेकांनी मंत्रिमंडळात समावेशाचा दावाही केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी दुपारी लखनऊला येतील आणि विधिमंडळ पक्षाच्या पहिल्या बैठकीला उपस्थित राहतील.
पक्षाच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर, शाह मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्या उमेदवारांची यादीही आणणार आहेत. येथे मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केल्यानंतर अंतिम स्वरूप दिले जाईल. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांच्या नावांबाबतही चित्र स्पष्ट होणार आहे. 2017 मध्ये याच बैठकीत केशव प्रसाद मौर्य आणि डॉ. दिनेश शर्मा यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची औपचारिक निवड झाल्यानंतर, काळजीवाहू मुख्यमंत्री आदित्यनाथ राज्यपालांची भेट घेतील आणि सरकार स्थापनेचा दावा करतील. शुक्रवारी दुपारी आयोजित शपथविधी समारंभात राज्यपाल काळजीवाहू मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना शपथ देतील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह जवळपास 50 मंत्री शपथ घेऊ शकतात.
मंत्रिमंडळात संधी मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार निवडणूक निकालानंतर सातत्याने प्रयत्न करत होते. गुरुवारी अंतिम निर्णयाची वेळ आली आहे. गुरुवारी विधीमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतर मंत्रिमंडळाची यादी निश्चित होताच संबंधित आमदारांना याची माहिती दिली जाईल, असे सांगण्यात येत आहे.
केजरीवाल संतापले..! म्हणाले, तर आम्ही राजकारणच सोडून देऊ; पहा, काय दिलेय भाजपला आव्हान..?
काँग्रेसचा मोर्चा आता गुजरातकडे..! भाजप-‘आम आदमी’ ला रोखण्यासाठी तयार केलाय खास प्लान..