Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

केजरीवाल संतापले..! म्हणाले, तर आम्ही राजकारणच सोडून देऊ; पहा, काय दिलेय भाजपला आव्हान..?

दिल्ली : तीन महापालिकांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय राजधानीत जोरदार राजकारण सुरू झाले आहे. या निमित्ताने आम आदमी पार्टी आणि भाजप पुन्हा आमनेसामने आले आहेत. या मुद्द्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी भाजपला सरळसरळ आव्हानच दिले आहे. केजरीवाल म्हणाले, की एमसीडी निवडणुकीत जर भाजपने विजय मिळवला तर आम्ही राजकारणच सोडून देऊ. भाजपकडे सत्ता असेल तर आता निवडणुका करा आणि जिंकून दाखवा, जिंकले तर राजकारण सोडेन, असे केजरीवाल म्हणाले.

Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले, की निवडणुका टाळता येतील का ? पराभवाच्या भीतीने निवडणुका टाळणारे हे लोक योग्य वर्तणूक करत नाहीत. तुम्ही छोट्या निवडणुका जिंकण्यासाठी या देशाच्या व्यवस्थेच्या विरोधात वागत आहात. हे काय आहे, हे अजिबात मान्य नाही. भारतीय जनता पक्ष म्हणतो की आम्ही जगातील सर्वात मोठा पक्ष आहोत. जगातील सर्वात मोठा पक्ष आणि दिल्लीतील एका छोट्या पक्षामुळे घाबरलेला, छोट्या निवडणुकीने घाबरला. भाजपमध्ये हिंमत असेल तर वेळेवर एमसीडी निवडणुका करुन दाखवा आणि जिंकून दाखवा, आम्ही राजकारण सोडू, अशा शब्दांत त्यांनी भाजपला आव्हान दिले.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशातील 5 राज्यांच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवला. या राज्यात पक्षाने तब्बल 90 जागा जिंकल्या. काँग्रेसला जोरदार झटका बसला. त्यामुळे आप आता विरोधी पक्षांना जोरदार आव्हान देत आहे. सध्या तरी आपमुळे काँग्रेसचे जास्त नुकसान झाले आहे. मात्र, राष्ट्रीय राजकारणात हा पक्ष आता भाजपलाही आव्हान देत आहे. पंजाबच्या विजयानंतर आता या पक्षाने गुजरातसह आणखी 8 राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे या राज्यात भाजप आणि काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत.

Advertisement

आता आणखी एका राज्यात आप काँग्रेसला देणार ताप.. पहा, पार्टीने काय केलाय प्लान..?

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply