Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेसचा मोर्चा आता गुजरातकडे..! भाजप-‘आम आदमी’ ला रोखण्यासाठी तयार केलाय खास प्लान..

मुंबई : गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी तयारी जोरात सुरू केली आहे. 5 राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसने (Congress) आता आपला मोर्चा गुजरातकडे वळवला आहे. 5 राज्यांतील पराभव विसरून पक्षाने आता गुजरातवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच मंगळवारी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुजरात काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपचा मुकाबला आणि आम आदमी पक्षाला (AAP) रोखण्यासाठी रणनिती तयार करण्यात आली.

Advertisement

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत भाजपसोबतच ‘आप’च्या विरोधात आक्रमक प्रचार करण्याचे मान्य करण्यात आले. सभापती आणि विधिमंडळ पक्षनेते यांची नुकतीच निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत आता काँग्रेस लवकरच संघटनेचा आणखी विस्तार करण्यावर आधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. अनेक राज्यांमध्ये पक्षांतरामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत पक्षानेही मागील अनुभवांतून आता शहाणे होण्यास पक्षाने सुरुवात केली आहे.

Loading...
Advertisement

काँग्रेस दिल्ली आणि पंजाबमधून नेते आणि कार्यकर्त्यांना गुजरातमध्ये पाठवणार असल्याचे बैठकीत मान्य करण्यात आले. यासह ते ‘आप’च्या कमतरता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसही आम आदमी पार्टीच्या विरोधात जोरदार प्रचार करणार आहे. या बैठकीत भाजप विरोधातील जनतेच्या प्रश्नांची यादी आतापासूनच तयार करण्याच्या सूचना नेत्यांना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात भाजपला घेरता यावे, यासाठी ते मुद्दे वेळोवेळी मांडणे हा त्यामागचा हेतू आहे.

Advertisement

गुजरात काँग्रेस नेत्यांच्या या बैठकीत यावेळी भाजपला अधिक आक्रमकतेने घेरण्यात येणार असल्याचे मान्य करण्यात आले. भाजपविरुद्ध सलग निवडणूक पराभव आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा उदय झाल्यानंतर काँग्रेसला आता दुहेरी रणनितीवर काम करणे भाग पडले आहे. त्यामुळे आता त्या दिशेने पावले टाकण्याची तयारी सुरू आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply