आम आदमीने केलाय जोरदार प्लान..! ‘त्या’ 9 राज्यांसाठी घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय; भाजप-काँग्रेसला होणार ताप..
मुंबई : देशातील 5 राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) दणदणीत विजय मिळवला आहे. आता पुढील निवडणुकांची (Election) तयारी पक्षाने सुरू केली आहे. आप पक्ष संघटनेचा विस्तार करण्यासाठी मोठे बदल करत आहे. सोमवारी पक्षाने 9 राज्यांतील निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली. काही राज्यांमध्ये या वर्षाच्या अखेरीस आणि अनेक राज्यांमध्ये 2023 च्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत.
आम आदमी पार्टीने ट्विट करून माहिती दिली, की आम आदमी पार्टीने अधिकृतपणे 9 राज्यांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने अनुभवी नेत्यांवर मोठी जबाबदारी दिली आहे. लवकरच आम आदमी पार्टी इतर राज्यांमध्येही संघटनेच्या विस्तारासाठी आणखी नेत्यांची यादी जाहीर करणार आहे. सध्या पक्षाने गुजरात, हिमाचल प्रदेश, राजस्थान, आसाम, छत्तीसगड, हरियाणा, केरळ, पंजाब, तेलंगाणा या राज्यांमध्ये निवडणूक प्रभारी नियुक्त केले आहेत.
गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचे दिल्लीचे आमदार गुलाब सिंह आणि राज्यसभेचे उमेदवार संदीप पाठक यांना गुजरातचे प्रभारी बनवण्यात आले आहे. त्याचवेळी पक्षाने आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडे हिमाचलची जबाबदारी दिली असून दुर्गेश पाठक यांना प्रभारी बनवण्यात आले आहे. पंजाबमध्ये जर्नेल सिंग यांना प्रभारी आणि संदीप पाठक यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे.
आसाममध्ये राजेश शर्मा यांच्याकडे प्रभारी, दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय आणि बुराडीचे आमदार संजीव यांच्याकडे छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आली आहे. सौरभ भारद्वाज यांना हरियाणाचे प्रभारी बनवण्यात आले असून त्यांच्याबरोबर राज्यसभा खासदार सुशील गुप्ता असतील. राजस्थानमधील आमदार विनय मिश्रा, तेलंगाणामध्ये आमदार सोमनाथ भारती आणि केरळमध्ये ए. राजा यांची पक्षाने निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
आता आणखी एका राज्यात आप काँग्रेसला देणार ताप.. पहा, पार्टीने काय केलाय प्लान..?