दिल्ली – महिला विश्वचषक 2022 (ICC Woman’s Cricket World Cup) मध्ये पाकिस्तानने (Pakistan) वेस्ट इंडिजचा (West Indies) आठ गडी राखून पराभव करून स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. सलग चार सामने गमावल्यानंतर पाकिस्तानचा संघ विजयी मार्गावर परतला आहे. हा संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी वेस्ट इंडिजचा पराभव करून भारताचा (India) मार्ग सुकर केला आहे. आता टीम इंडिया आपल्या उरलेल्या दोनपैकी एक सामना जिंकूनही उपांत्य फेरीत पोहोचू शकते.
पावसामुळे सामना 20 षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 89 धावा केल्या. पाकिस्तानने 18.5 षटकांत 2 गडी गमावून 90 धावा करून सामना जिंकला.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
निदा दारने घेतल्या चार विकेट
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निदा दारच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत चार षटकांत चार बळी घेतले. त्याने 2.50 च्या इकॉनॉमी रेटने फक्त 10 धावा दिल्या. त्यांच्याशिवाय फातिमा, संधू आणि सोहेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. वेस्ट इंडिज संघाला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 89 धावा करता आल्या. डॉटिनने सर्वाधिक 27 आणि टेलरने 18 धावा केल्या. त्याचवेळी फ्लेचरने 12 धावांची खेळी खेळली. याशिवाय एकाही कॅरेबियन फलंदाजाला दुहेरी आकडा स्पर्श करता आला नाही.
19 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाच्या फलंदाजांनी अत्यंत संयमी आणि समंजस फलंदाजी करत हे लक्ष्य दोन गडी गमावून पूर्ण केले. मुनीबा अलीने सर्वाधिक 37 धावा केल्या. तर कर्णधार बिस्माह मारूफने नाबाद 20 आणि सोहेलने 22 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून फ्लेचर आणि सेलमन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली
पाकिस्तानच्या विजयाने भारताचा मार्ग सुकर
ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली असून दक्षिण आफ्रिकेचे उपांत्य फेरीत जाणे जवळपास निश्चित झाले आहे. उर्वरित दोन जागांसाठी भारत, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात स्पर्धा आहे. न्यूझीलंड, बांगलादेश आणि पाकिस्तानही उपांत्य फेरीत पोहोचू शकतात, पण त्याची आशा नगण्य आहे. अशा स्थितीत वेस्ट इंडिजच्या पराभवाचा फायदा भारताला झाला असून उरलेल्या दोनपैकी एक सामना जिंकूनही टीम इंडिया उपांत्य फेरीत प्रवेश करू शकते.
वेस्ट इंडिजचे सहा सामन्यांत सहा गुण झाले असून या संघाचा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. हा सामना वेस्ट इंडिज जिंकण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर भारताचे पाच सामन्यांत चार गुण झाले असून उर्वरित दोन सामने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियानंतर भारताचा धावगती इतर सर्व संघांपेक्षा चांगला आहे. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत होऊनही भारताला उपांत्य फेरी गाठण्याची संधी असेल.