मुंबई : भाजपने गोव्यात मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली आहे. प्रमोद सावंत यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यात आज विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्यात आली असून, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गोव्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत काही दिवसांपासू विविध चर्चा सुरू होत्या. मात्र, भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा सावंत यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
या राज्यात प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या काँग्रेसला यावेळी केवळ 11 जागा मिळू शकल्या. एका जागेअभावी राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी महाराष्ट्रवादी गोमंतक (एमजीपी) आणि अपक्ष उमेदवारांच्या पाठिंब्याने पक्षाला सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, राज्यात भाजपला 33.31 टक्के मते मिळाली आहेत. तर काँग्रेसला 23.46 टक्के मते होती.
उत्तराखंडमधील मुख्यमंत्र्यांबाबत सस्पेन्स आता जवळपास संपला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची विधायक मंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. याबरोबर उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून धामी यांनाच संधी मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आज पार पडलेल्या विधायक मंडळाच्या बैठकीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत धामी यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली. ही घोषणा करताना सिंह म्हणाले की, त्यांच्या केवळ सहा महिन्यांच्या कार्यकाळात धामी यांनी लोकांची मने जिंकली. ज्यामुळे पक्षाचा विजय झाला. मात्र, या निवडणुकीत धामी यांचा पराभव झाला. त्यामुळे नेतृत्वाला मुख्यमंत्र्यांच्या नावावर नव्याने विचार करावा लागले. यामुळे मुख्यमंत्री जाहीर करण्यास तब्बल 11 दिवसांचा वेळ लागला.
गोवा आणि मणिपूरसाठी BJP ने तयार केला मास्टर प्लॅन; समोर आली मोठी बातमी