मुंबई : पंजाबमध्ये काँग्रेसला जबरदस्त झटका दिल्यानंतर आम आदमी पार्टी आणखी एका राज्यात काँग्रेसला आव्हान देणार आहे. भाजप प्रमाणेच आपने काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे. सध्याच्या काळात आपमुळे भाजपपेक्षा काँग्रेसलाच जास्त नुकसान सहन करावे लागत आहे. छत्तीसगडमधील आगामी विधानसभा निवडणूक आम आदमी पक्षाने (AAP) दुसऱ्यांदा लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी मोठे दावे केले आहेत. ते म्हणाले की, पक्षाने राज्यात ब्लॉक पातळीवर कार्यकर्त्यांची निर्मिती केली असून आता सदस्यत्व मोहिमेवर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले जात आहे. पक्षाच्या नेत्यांनी असा दावा केला की ते ‘आप’मध्ये येण्यास इच्छुक असलेल्या अनेक काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत.
आप नेते आणि दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय रविवारी दोन दिवसीय छत्तीसगड दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी राज्यातील आप नेत्यांची बैठक घेतली आणि छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे उद्घाटनही केले. पंजाबमध्ये पक्षाच्या विजयानिमित्त सोमवारी रायपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘विजय यात्रे’ मध्येही राय सहभागी होणार आहेत. छत्तीसगडच्या राजकारणात पक्ष प्रवेशाबाबत जनतेला संदेश देणार आहेत.
2018 च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ ने छत्तीसगडमध्ये 90 पैकी 85 जागा लढल्या होत्या, पण पक्षाला आपले खातेही उघडता आले नव्हते. मात्र, यावेळी पुन्हा ‘आप’ नेते 2023 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही कडवी टक्कर देणार असल्याचा दावा करत आहेत.
आम्ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ब्लॉक पातळीवर कॅडर तयार केले आहेत आणि आता आम्ही आमच्या सदस्यत्व मोहिमेवर लक्ष केंद्रित करत आहोत. बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांचा विकास करणे हे AAP चे उद्दिष्ट आहे आणि आम्हाला खात्री आहे की पक्ष निवडणुकीआधी राज्यात कॉंग्रेस आणि भाजप या दोघांनाही आव्हान देण्याच्या स्थितीत असेल.
ते पुढे म्हणाले, की ‘भाजपने 15 वर्षे राज्य केले पण त्यांनी छत्तीसगडच्या लोकांसाठी काही विशेष केले नाही. काँग्रेसने आपल्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत जनतेला आणि संपूर्ण राज्यासाठी काहीच केले नाही. लोकांना समजले आहे आणि आता ते आमच्यासारख्या चांगल्या पर्यायाची अपेक्षा करत आहेत. सन 2018 च्या निवडणुकीत एकूण 90 जागांपैकी काँग्रेसने 68 जागा जिंकल्या होत्या तर भाजपला 15 जागा मिळाल्या होत्या.
उत्तराखंडमध्ये राजकीय घडामोडी जोरात..! ‘त्यासाठी’ भाजपने सर्व आमदारांना दिलाय ‘हा’ आदेश..
‘EVM कितपत आहे विश्वासार्ह?’ प्रश्न पडलाय तर वाचा माहिती आणि आपणच याचे उत्तर शोधा की..