दिल्ली – प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) नुकतेच महाराष्ट्रातील (Maharashtra) पुणे (Pune) आणि ठाणे(Thane) येथील युनिकॉर्न स्टार्ट-अप ग्रुपवर छापे टाकले होते, त्यानंतर विभागाने सुमारे 224 कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता उघडकीस आणली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने रविवारी ही माहिती दिली. विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, 9 मार्च रोजी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील 23 ठिकाणी छापे टाकण्यात आले.
हा समूह बांधकाम साहित्याच्या घाऊक आणि किरकोळ विक्रीचा व्यवहार करतो आणि त्याची वार्षिक उलाढाल 6,000 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत 1 कोटी रुपयांची अघोषित रोकड आणि 22 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. निवेदनानुसार, गटाने खात्यांमध्ये फसव्या खरेदीची नोंद केल्याचे आढळून आले. शिवाय, गटाने बेहिशेबी रोकड जमा केली.
Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
सीबीडीटीने सांगितले की, “हे पुरावे देताना, समूहाच्या संचालकांची चौकशी करण्यात आली ज्यात त्यांनी वेगवेगळ्या मूल्यांकन वर्षांमध्ये 224 कोटी रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त उत्पन्न उघड केले. त्यानंतर त्यांनी थकबाकीदार कर भरण्याची ऑफर दिली.
या समुहाने मॉरिशसच्या मार्गाने खूप जास्त प्रीमियमवर शेअर्स देऊन परकीय निधी जमा केल्याचेही तपासात उघड झाले आहे. सीबीडीटीने सांगितले की, मुंबई आणि ठाणे येथील शेल कंपन्यांचे ‘क्लिष्ट’ हवाला नेटवर्क देखील उघडकीस आले आहे.