मुंबई : उत्तराखंड (Uttarakhand) विधानसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत असूनही भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याबाबतची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी सोमवारी डेहराडूनमध्ये (Dehradun) विधिमंडळ बैठक होणार आहे. त्याच वेळी, सोमवारी सकाळी राज्यपाल राजभवनात प्रोटेम स्पीकर बन्सीधर भगत यांना शपथ देतील. त्यानंतर प्रोटेम स्पीकर सर्व नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील.
भाजप प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांनी केंद्रीय नेतृत्वाबरोबर बैठकीत भाग घेतल्यानंतर ही माहिती दिली आहे. याच अनुषंगाने भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी आज दिल्लीत (Delhi) महत्त्वाची बैठक झाली. केंद्रीय नेतृत्वाच्या आवाहनावरून काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी शनिवारी दिल्लीत पोहोचले. भाजप प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक हेही दिल्लीला गेले आहेत, तर माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि सतपाल महाराज आधीच दिल्लीत आहेत. खासदार रमेश पोखरियाल निशंक आणि अजय भट्ट देखील बैठकीत उपस्थित होते.
या सर्व नेत्यांनी रविवारी केंद्रीय नेत्यांबरोबर बैठक घेतली. दुसरीकडे, पक्षाचे केंद्रीय निरीक्षक आज डेहराडूनला पोहोचणार होते, मात्र ते पुढे ढकलण्यात आले आहे. आता निरीक्षक रविवारी सायंकाळी किंवा सोमवारी सकाळी येणार असल्याचे समजते. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुष्कर सिंह धामी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उत्तराखंडच्या जनतेने सलग दुसऱ्यांदा भाजपसला विजयी केले. सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा चेहरा केंद्रीय नेतृत्व ठरवणार आहे.
दरम्यान, उत्तराखंडमध्ये भाजपला सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात पहिल्यांदाच विधानसभेच्या 70 पैकी 47 जागांवर पक्षाने सलग दुसऱ्यांदा स्वबळावर बहुमत मिळवले आहे. पण खुद्द मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. अशा परिस्थितीत धामी यांच्याकडे कारभार सोपवायचा की निवडून आलेल्या आमदारांपैकी नवा मुख्यमंत्री म्हणून निवड करायची, असा प्रश्न भाजप नेतृत्वाला पडला होता.
गेल्या कार्यकाळात पक्षाने तीन मुख्यमंत्री बदलले आहेत. म्हणूनच यावेळी त्यांना असा चेहरा द्यायचा आहे, जो 5 वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि 2024 मध्ये राज्यातील लोकसभेच्या पाचही जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू शकेल.
भाजप नेतृत्वाने गुजरातमध्ये याआधी नेतृत्व बदलून ज्या प्रकारे चकित केले होते, तसेच उत्तराखंडमध्येही होऊ शकते. निवडून आलेल्या आमदारांमधून नव्या चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. धामी, धनसिंग रावत, गणेश जोशी यांसह आणखी काही आमदारांची नावे चर्चेत होती. मात्र, आता पुष्कर सिंह धामी हेच पुढील मुख्यमंत्री असतील असे समजते.
उत्तराखंडमध्ये राजकीय घडामोडी जोरात..! ‘त्यासाठी’ भाजपने सर्व आमदारांना दिलाय ‘हा’ आदेश..