Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. मार्चमध्येच जाणवतोय मे मधील उन्हाळा.. हवामान खात्याने देशातील ‘या’ शहरांना दिलाय अलर्ट..

दिल्ली : सध्या मार्च महिना सुरू आहे. मात्र दिल्लीतील (Delhi) उष्णतेमुळे आतापासूनच लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. कडाक्याचे ऊन आणि उष्ण वारे यामुळे दिल्लीतील लोकांना त्रास होऊ लागला आहे. शनिवारी दिल्लीचे कमाल तापमान (Temperature) 36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्यावर (IMD) विश्वास ठेवला तर आता तापमानात सातत्याने वाढ होणार आहे. खासगी हवामान संस्थांच्या मते, दिल्लीत मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पारा 40 अंशांच्या पुढे जाऊ शकतो.

Advertisement

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक एम. महापात्रा यांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील दिवसाचे तापमान यावर्षात सामान्यपेक्षा जास्त असेल. हवामान अंदाजानुसार, मार्च महिन्यातच उष्णतेने 77 वर्षांचा विक्रम मोडीत काढला जाऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्याचा नवा सर्वकालीन विक्रमही होऊ शकतो. मार्चमधील सध्याचा सर्वकालीन रेकॉर्ड 31 मार्च 1945 रोजीचा आहे, जेव्हा कमाल तापमान 40.6 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले होते. यंदा 18 मार्चपर्यंत कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. संपूर्ण महिनाभर आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या पावसाची शक्यता नगण्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Advertisement

त्याच वेळी, आयएमडीच्या म्हणण्यानुसार, राजस्थानमधील (Rajasthan) बहुतेक भाग उष्णतेच्या लाटेत (Heat Wave) आहेत जेथे बांसवाडा आणि बाडमेरमध्ये गेल्या 24 तासांत 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विभागानुसार, राज्यातील अनेक भाग उष्ण वाऱ्यांच्या तडाख्यात आहेत. हवामान खात्याने बांसवाडा, चित्तोडगड, डुंगरपूर, प्रतापगड, बिकानेर, नागौर, जैसलमेर, जोधपूर, बाडमेर आणि जालोर इत्यादी जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.

Loading...
Advertisement

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अनेक भागात हीच स्थिती आहे. मध्य प्रदेशातील पाच जिल्ह्यांमध्ये सुरू असलेली उष्णतेची लाट (Heat Wave) शनिवारीही कायम राहणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. आयएमडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, यंदा मध्य प्रदेशात अधिक उष्णता जाणवण्याची शक्यता आहे आणि सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान अपेक्षित आहे.

Advertisement

कडाक्याचा उन्हाळा करणार हैराण.. ‘या’ 8 राज्यात येणार उष्णतेची लाट; हवामान विभागाने दिलाय इशारा..

Advertisement

‘त्या’ संकटापुढे अमेरिका-कॅनडा हतबल; पहा कशामुळे व्हावे लागलेय ‘लॉक’च..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply