उत्तराखंडमध्ये राजकीय घडामोडी जोरात..! ‘त्यासाठी’ भाजपने सर्व आमदारांना दिलाय ‘हा’ आदेश..
मुंबई : उत्तराखंडच्या (Uttarakhand) नव्या मुख्यमंत्र्यांबाबत (Chief Minister) रविवारी निर्णय घेतला जाऊ शकतो आणि त्यासाठी भाजपने (BJP) राज्यातील नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित केली आहे. राज्यात पक्षाने 47 जागा जिंकल्या असून आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत उद्या निर्णय होऊ शकतो, असे मानले जात आहे. यासाठी भाजपने 20 मार्च रोजी सर्व आमदारांना डेहराडूनला (Dehradun) बोलावले असून उद्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.
सध्या राज्यात मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय झालेला नाही. राज्यात अनेक दावेदार असले तरी पार्टीने अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही किंवा अधिकृतपणे घोषणाही केलेली नाही. मात्र, तरीही यावेळी सुद्धा माजी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेच मुख्यमंत्री असतील, असे सांगण्यात येत आहे. पक्षाने आपल्या आमदारांना 20 मार्च रोजी डेहराडूनला बोलावले आहे जेणेकरून बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय घेता येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळाही जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये थेट प्रक्षेपित होणार असून त्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येणार आहेत. जबाबदारी जिल्हा व विभागीय घटकांच्या अधिकारी व नेत्यांवर देण्यात आली आहे. राज्यात मुख्यमंत्र्यांच्या नावावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्याचवेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. कारण धामी यांना राज्याचे मुख्यमंत्री केले तेव्हाही कोश्यारी दिल्लीत पोहोचले होते. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत.
दरम्यान, उत्तराखंडमध्ये भाजपला सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात पहिल्यांदाच विधानसभेच्या 70 पैकी 47 जागांवर पक्षाने सलग दुसऱ्यांदा स्वबळावर बहुमत मिळवले आहे. पण खुद्द मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. अशा परिस्थितीत धामी यांच्याकडे कारभार सोपवायचा की निवडून आलेल्या आमदारांपैकी नवा मुख्यमंत्री म्हणून निवड करायची, असा प्रश्न भाजप नेतृत्वाला पडला होता.
गेल्या कार्यकाळात पक्षाने तीन मुख्यमंत्री बदलले आहेत. म्हणूनच यावेळी त्यांना असा चेहरा द्यायचा आहे, जो 5 वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि 2024 मध्ये राज्यातील लोकसभेच्या पाचही जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू शकेल.
भाजप नेतृत्वाने गुजरातमध्ये याआधी नेतृत्व बदलून ज्या प्रकारे चकित केले होते, तसेच उत्तराखंडमध्येही होऊ शकते. निवडून आलेल्या आमदारांमधून नव्या चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. धामी, धनसिंग रावत, गणेश जोशी यांसह आणखी काही आमदारांची नावे चर्चेत होती. मात्र, आता पुष्कर सिंह धामी हेच पुढील मुख्यमंत्री असतील असे समजते.
उत्तराखंड मुख्यमंत्री पदाबाबत नवीन अपडेट..! पहा, भाजपने कोणाला मुख्यमंत्री करायचे ठरवलेय..?