Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अखिलेश यादव यांनी भाजपला दिलाय ‘हा’ गंभीर इशारा; ‘त्या’ मुद्द्यावरही केलीय जोरदार टीका..

दिल्ली : महागाई (Inflation) मुद्द्यावर उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणुका संपताच भाजपने होळीच्या सणावर महागाईची भेट देऊन मतदारांचे कर्ज परत केले आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. पीठ, मैदा, तेल, तूप यासह अन्य वस्तूंचे भाव वाढले आहेत. 2024 मध्ये जनता भाजपला धडा शिकवेल असेही ते म्हणाले आहेत.

Advertisement

समाजवादी पक्षाने जारी केलेल्या निवेदनानुसार, अखिलेश यादव (Akhilesh Yadav) म्हणाले, की “उत्तर प्रदेश विधानसभा 2022 च्या निवडणुकीच्या निकालावरून हे स्पष्ट झाले आहे की जनतेच्या मोठ्या वर्गाचा विश्वास समाजवादी पक्षावर आहे. “पोस्टल बॅलेटमध्ये समाजवादी पक्ष-आघाडीला 51.5 टक्के मते मिळाली आणि त्यानुसार 304 जागांवर समाजवादी पक्ष-आघाडीचा विजय निवडणुकीचे सत्य सांगत आहे. असे असले तरी उत्तर प्रदेशच्या मतदारांनी समाजवादी पक्षाच्या जागा अडीच पटीने वाढ करण्याकडे कल दिला असून भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी होणे हे भविष्यातील संकेत आहे.

Advertisement

अखिलेश यादव म्हणाले की, सत्ताधारी पक्षाच्या आश्रयाने गुन्हेगारी तत्व पुन्हा सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा गोरखपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळू लागली आहे. ना कायद्याचा धाक आहे ना पोलिसांचा धाक, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. भारतीय जनता पार्टीचे सत्य सर्वांसमोर आहे. खोटारडेपणाचा धंदा फार काळ चालणार नाही. जनतेने आता भविष्यासाठीही आपला इरादा दर्शविला आहे. 2024 मध्ये जनता भाजपला कठोर धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) घवघवीत यश मिळवले आहे. चार राज्यात भाजपने जबरदस्त विजय मिळवला आहे. त्यामुळे या राज्यात आता भाजपने सरकार स्थापन करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. अद्याप याबाबत काहीही स्पष्ट नाही. गोव्यात मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर वाद सुरू आहेत. तर उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे समोर आली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदी आदित्यनाथ हेच कायम राहणार आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री पदासाठी यावेळी जोरदार राजकारण पहायला मिळत आहे. यावेळी तर भाजपने राज्यात 4 उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा विचार सुरू केला आहे.

Advertisement

UP Election : उत्तर प्रदेशात 4 उपमुख्यमंत्री होणार..? ; पहा, काय सुरू होतेय नवीन राजकारण..

Advertisement
Advertisement

Leave a Reply