Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पराभवामुळे सोनिया गांधींनी घेतला मोठा निर्णय: प्रदेश अध्यक्षांना दिला धक्का

दिल्ली – नुकताच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाला पाच पैकी एकही राज्यात सरकार स्थापन करता आलेली नाही.

Advertisement

यामुळे आता काँग्रेसची हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी मोठा निर्णय घेत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या पीसीसी अध्यक्षांचे राजीनामे मागितले आहेत. त्यांनी त्यांना पीसीसीच्या पुनर्रचनेसाठी राजीनामा देण्यास सांगितले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.

Advertisement

उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय लल्लू तमकुही राज विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर होते. लल्लू यांना जामीनही वाचवता आला नाही. त्यांना केवळ 14.78% मते मिळाली. उत्तराखंड काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गोदियाल यांचा श्रीनगर मतदारसंघातून पराभव झाला. त्यांचा भाजपच्या धनसिंह रावत यांनी 587 मतांनी पराभव केला.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचा अमृतसर पूर्व मतदारसंघातून पराभव झाला. त्यांचा आपच्या जीवन ज्योत कौर यांनी 6,750 मतांनी पराभव केला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply