Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आम्हालाच कळेना.. तरीही लोक भाजपलाच का मत देतात..? ; काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यानी विचारलाय प्रश्न; पहा, काय आहे प्रकार..

दिल्ली : सन 2017 नंतर 2022 मध्ये देखील उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरीश रावत यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लालकुआ विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार मोहन सिंह बिश्त यांनी त्यांचा 14 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. काँग्रेसने रामनगर विधानसभा मतदारसंघाऐवजी हरीश रावत यांना लालकुआ मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत हरीश रावत यांनी दोन जागांवर निवडणूक लढली होती आणि त्यावेळीही त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

Advertisement

पराभवानंतर हरीश रावत म्हणाले की, माझ्यासाठी निकाल अतिशय आश्चर्यकारक आहेत. मला समजत नाही की इतक्या प्रचंड महागाईनंतर सुद्धा हा जर लोकांचा आदेश असेल तर लोक कल्याणाची व्याख्या काय असेल, यानंतरही ‘भाजप जिंदाबाद’ म्हणणारे लोक मला समजत नाहीत. ते पुढे म्हणाले की, आमची प्रचाराची रणनिती अपूर्ण होती आणि प्रचार समितीचा अध्यक्ष या नात्याने मी ही जबाबदारी स्वीकारतो.

Advertisement

हरिश रावत म्हणाले की, उत्तराखंडमधील लोकांची मने जिंकण्यासाठी आमचे प्रयत्न कमी पडले. आमची खात्री होती की लोकांना परिवर्तन हवे आहे, यासाठी लोक मतदान करतील, आमच्या प्रयत्नांमध्ये नक्कीच कमतरता असेल, मी ते स्वीकारतो आणि पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. मी लोकांचा विश्वास जिंकू शकलो नाही.

Loading...
Advertisement

हरिश रावत यांनी मुख्यमंत्री असताना 2017 च्या विधानसभा निवडणुकीत दोन जागांवरून विधानसभा निवडणूक लढली होती. मात्र दोन्ही जागांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी त्यांनी नैनिताल जिल्ह्यातील हल्द्वानीजवळील लालकुआ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली आणि यावेळीही राज्यातील जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

Advertisement

दरम्यान, उत्तराखंड मध्ये सुद्धा भाजपने दुसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. काल जाहीर झालेल्या निवडणूक निकालात भाजपने या राज्यात स्पष्ट बहुमत मिळवले. 70 सदस्यीय विधानसभेत भाजपने एकूण 47 जागांवर विजय मिळवला काँग्रेसला फक्त 19 जागा जिंकता आल्या.  तर 4 जागांवर अन्य उमेदवारांनी विजय मिळवला.

Advertisement

Uttarakhand Election : उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्यांचा पराभव.. भाजपला पडलाय ‘हा’ मोठे संकट..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply