Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भविष्यात ‘आप’ भाजपला देणार ‘ताप’..? ; जाणून घ्या, काय म्हटलेय भाजप नेत्यांनी..

मुंबई : पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 2022 मध्ये प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. राज्यात प्रथमच आपचे सरकार स्थापन होणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAP 117 सदस्यीय पंजाब विधानसभेत 92 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. आम आदमी पक्षाच्या या विजयानंतर राष्ट्रीय पातळीवरही ‘आप’ भाजपसाठी मोठा धोका ठरू शकतो, असे काही लोकांचे मत आहे. मात्र, भाजपने याचा साफ इन्कार केला आहे.

Advertisement

भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी सांगितले, की 2022 मधील पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या प्रचंड विजयाचा अर्थ असा नाही की पक्ष राष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पक्षासाठी (भाजप) धोका बनू शकतो. आम आदमी पक्षाला भाजप विरोधात लढायचे असेल तर त्यांनी लोकसभेच्या किमान 100 जागा जिंकल्या पाहिजेत, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. मुख्य पक्ष म्हणून आप कुठेतरी भाजपविरोधी मतांची विभागणी करेल, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

Advertisement

भाजप ज्येष्ठ नेते पी. मुरलीधर राव म्हणाले, की येत्या 20 वर्षातही भाजप इथेच राहणार आहे. मात्र, काँग्रेसची स्थिती कमकुवत झाल्यानंतर भाजपविरोधी मते आम आदमी पक्षाच्या बाजूने पडण्याची शक्यता आहे. मात्र, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून उदयास येण्यासाठी ‘आप’ला लोकसभेत किमान 100 जागा जिंकाव्या लागतील.” मात्र, आम आदमी पार्टीची रणनिती काही प्रमाणात भाजप सारखीच असल्याचे काही नेत्यांनी सांगितले. कारण आप सुद्धा विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारा पक्ष ठरत आहे.

Loading...
Advertisement

भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याने सांगितले, की “आप कल्याणकारी राजकारणात आहे आणि एक बळकट (अरविंद केजरीवाल) नेतृत्वात पुढे जात आहे. हा पक्ष दुर्बल घटकांनाही आकर्षित करत आहे. दुर्बल घटकातील मतदारांनीही आपवर पूर्ण विश्वास दाखवला आहे. भविष्यात हे आमच्यासाठी चांगले सिद्ध होणार नाही. पण अर्थातच पुढे काय होईल हे सांगता येत नाही.” भाजप नेत्यांनी मात्र कबूल केले की आम आदमी पार्टीची वाढती लोकप्रियता AAP ला मजबूत आणि मोठा पक्ष बनवू शकते.

Advertisement

LIVE Punjab Assembly Election Result 2022 : पंजाबी प्रदेशात सत्ताबदल..! ‘आप’ आहे इतक्या जोमात

Advertisement

Punjab Election Result : ‘आप’ ने केलीय जबरदस्त कामगिरी; अरविंद केजरीवाल यांनी दिलीय ही प्रतिक्रिया..

Advertisement
Advertisement

Leave a Reply