Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पंजाब नंतर केजरीवाल करणार: ‘या’ दोन राज्यांना टार्गेट; करणार मोठी घोषणा..

दिल्ली – पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab election) चांगली कामगिरी केल्यानंतर आम आदमी पार्टीने (AAP) आपल्या पुढील निशाण्यावर सुरुवात केली आहे. जी गुजरात (Gujarat) आणि हिमाचल प्रदेशची (Himachal Pradesh) सत्ता मिळवण्यासाठी आहे. गुरुवारी पक्षाचे नेते अक्षय मराठे म्हणाले की, ‘होय, आम्ही गुजरात आणि हिमाचल प्रदेशात नक्कीच जाणार आहोत. ही दोन राज्ये आमच्या रडारवर असून पक्ष कार्यकर्त्यांना या राज्यांमध्ये पाठवत आहे. त्याचा निश्चितच मोठा परिणाम होईल. आपचे नेते अक्षय मराठे पुढे म्हणाले की, अनेक दशकांपासून भारतातील जनतेला दोनच पक्षांपैकी एकाची निवड करायची होती. या दोन्ही पक्षांनी त्याच्यासाठी काम केलेले नाही. जनतेला प्रथमच पर्याय दिसत आहे. लोकांना बदल हवा आहे.

Advertisement

पंजाबमधील ‘आप’च्या मोठ्या विजयावर बोलताना अक्षय मराठे म्हणाले की, “मोठे राजकीय पक्ष आम्हाला स्वीकारत नाहीत किंवा आमची उपस्थिती मान्य करत नाहीत. पण तरीही आम्ही त्यांना क्लीन स्वीप करतो. मी नम्रतेने सांगतो” की आम्ही गेली 10 वर्षे खूप मेहनत केली आहे. आणि आमची कामगिरी सर्वजण पाहू शकतात.”

Loading...
Advertisement

Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

पंजाब विधानसभेच्या 117 जागांवर दुपारी 4 वाजेपर्यंत आम आदमी पार्टी 91 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 17 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर शिरोमणी अकाली दल 6 जागांसह आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply