दिल्ली – उत्तर प्रदेशच्या 18व्या विधानसभेच्या (Uttar Pradesh elections) निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. ट्रेंडनुसार, यूपीमध्ये भाजपने 273 जागांवर आघाडी घेतली आहे. तर सपा फक्त 123 जागांवरच मर्यादित दिसत आहे. कुशीनगरच्या फाजिलनगर मतदारसंघातून स्वामी प्रसाद मौर्य यांचा पराभव झाला आहे. मोहनलालगंज मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे.
देवबंदमधून भाजपचे उमेदवार ब्रिजेश सिंह विजयी झाले आहेत, तर प्रतापगडचा पहिला निकाल जनसत्ता दलाच्या खात्यात आला आहे.
योगी एक लाख मतांनी विजयी, संगीत सोम पराभूत
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 1,02,399 मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाचे संगीत सोम हे मेरठच्या सरधना मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. सपाचे अतुल प्रधान यांनी त्यांचा पराभव केला. भाजपचे फायरब्रँड नेते संगीत सोम यांना विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही. सरधनामध्ये प्रथमच सायकल धावली. सपा आरएलडी आघाडीचे अतुल प्रधान यांनी सरधना विधानसभा मतदारसंघातून भाजपचे फायर ब्रँड नेते संगीत सोम यांचा पराभव केला आहे.
Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
संगीत सोम यांनी याआधी दोनदा निवडणूक जिंकली होती, तर अतुल प्रधान दोनदा निवडणूक हरले होते. सरधना जागेवर सपाचा उमेदवार जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. विजयाचे अंतर सुमारे 18000 मतांचे आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. मतमोजणीच्या चार फेऱ्या व्हायच्या आधी संगीत सोम यांनी मोदीपुरम येथील कृषी विद्यापीठातील मतमोजणीची जागा सोडली होती.
जौनपूरमध्ये भाजप-सपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
जौनपूरमध्ये भाजप-सपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाच्या ट्रेंडबद्दल घोषणाबाजी करताना एकमेकांशी भिडले. निमलष्करी दलाचे जवान लाठीमार करत धावले तेव्हा आंदोलकांनी दगडफेक केली. मतमोजणी केंद्राबाहेर जौनपूर-शाहगंज रस्त्यावर सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे.