Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Election Result 2022 : 5 राज्यांत काँग्रेसचे खराब प्रदर्शन; राहुल गांधी यांनी दिलीय ‘ही’ प्रतिक्रिया..

दिल्ली: उत्तर प्रदेश ते गोव्यापर्यंत 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची खराब कामगिरी आणि पंजाबमधील दणदणीत पराभवानंतर, ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की ‘जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारा. ज्यांनी जनादेश जिंकला त्यांना शुभेच्छा. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांचे त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल धन्यवाद. आम्ही याद्वारे शिकण्याचा प्रयत्न करू आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू.’

Advertisement

पंजाबमध्ये काँग्रेसला आम आदमी पक्षाकडून (आप) पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या तीन राज्यांमध्येही पक्षाला पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला म्हणाले की, ‘पाच राज्यांमध्ये विजयी झालेल्या सर्व राजकीय पक्ष आणि व्यक्तींना शुभेच्छा. लोकशाहीत जनतेचा निर्णय महत्त्वाचा असतो आणि हीच आपल्या लोकशाहीची ताकद आहे. पाच राज्यांचे निवडणूक निकाल काँग्रेस पक्षाच्या अपेक्षेविरुद्ध आले आहेत. उत्तराखंड, गोवा आणि पंजाबमध्ये आम्हाला चांगल्या निकालाची अपेक्षा होती, पण जनतेचा आशीर्वाद मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो हे मान्य करावे लागेल.’

Advertisement

ते म्हणाले, की ‘पंजाबमध्ये चरणजितसिंग चन्नी यांच्या रूपाने आम्ही नम्र, स्वच्छ आणि नवीन नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला. परंतु अमरिंदर सरकारच्या साडेचार वर्षांच्या सत्ताविरोधी लाटेवर मात करू शकलो नाही. जनतेने परिवर्तनासाठी मतदान केले. आम्ही जनतेचा आदेश मान्य करतो आणि पंजाबमधील विजयासाठी आम आदमी पक्षाचे अभिनंदन करतो.’ सुरजेवाला म्हणाले की, ‘आम्ही उत्तराखंड आणि गोव्यात चांगल्या निवडणुका लढलो, पण लोकांची मने जिंकून विजयापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. आपल्याला आधिक कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशातील निवडणूक राज्यात सगळीकडेच काँग्रेसचे प्रदर्शन अगदीच निराशाजनक राहिले आहे. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब कुठेही काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नाही. विशेष म्हणजे,  पंजाबमध्ये याआधी काँग्रेसचे सरकार होते. आता मात्र हे मोठे राज्यही काँग्रेसला टिकवून ठेवता आले नाही. या राज्यात आम आदमी पार्टीने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. मणिपूर राज्यात मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 28 जागा जिंकल्या होत्या. आता मात्र तीन जागा जिंकणेही कठीण ठरत आहे. गोवा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेससाठी फार वेगळी परिस्थिती नाही.

Advertisement

Uttarakhand Elections : उत्तराखंडमध्ये काँग्रेसला जोरदार झटका..! मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार उमेदवाराचा पराभव..

Advertisement

Manipur Elections : भाजप करतोय बहुमताकडे वाटचाल; काँग्रेस मात्र कोमात.. पहा, किती जागांवर घेतलीय आघाडी..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply