Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Punjab Election Result : ‘आप’ ने केलीय जबरदस्त कामगिरी; अरविंद केजरीवाल यांनी दिलीय ही प्रतिक्रिया..

दिल्ली : पंजाब विधानसभेच्या 117 जागांवर झालेल्या निवडणुकांचे निकाल (Punjab Election Result 2022) आज जाहीर होत आहेत. आम आदमी पक्षाने (AAP) येथे मोठ्या फरकाने बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यामुळे राज्यात पक्षाचे सरकार स्थापन होण्याची खात्री आहे. मात्र, अंतिम निकाल येण्यास वेळ लागणार आहे. पंजाबमध्ये पक्षाच्या या विजयाबद्दल आम आदमी पार्टीचे0 प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आनंद व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Advertisement

अरविंद केजरीवाल म्हणाले, की पंजाबच्या जनतेने चमत्कार केले आहेत. आम्ही व्यवस्था बदलली आहे. आता आपण नवीन भारत घडवू. ज्यामध्ये मुले युक्रेनला जाणार नाहीत. चन्नी यांचा मोबाईल रिपेअर करणाऱ्या उमेदवाराने पराभव केल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही प्रामाणिक राजकारण सुरू केले आहे. लोकांची कामे सुरू झाली आहेत. ते इतके सोपे नाही. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या विरोधात एकत्र आले. सरतेशेवटी केजरीवाल हे दहशतवादी असल्याचे सांगण्यात आले. मात्र, जनतेने हे साफ नाकारुन केजरीवाल देशभक्त असल्याचे सिद्ध केले, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, यंदा पंजाब विधानसभा निवडणूक दिग्गजांना जोरदार झटका देणारी ठरली आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पंजाबसारखे मोठे राज्य काँग्रेसने आता गमावलेच आहे. या राज्यात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने जबरदस्त कामगिरी करत विरोधी पक्षांचा दणदणीत पराभव केला आहे. इतकेच नाही तर या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा झटका बसला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पटियाला मतदारसंघातून पराभव झाला आहे.

Advertisement

तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांचा तर दोन मतदारसंघातून पराभव झाला आहे. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भदौर मतदारसंघातून पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा पराभव करणारे आम आदमी पक्षाचे उमेदवार लाभसिंह उगोके हे एका मोबाइल दुरुस्ती दुकानात काम करतात. पंजाब निवडणुकीतील हा सर्वात मोठा उलटफेर मानला जात आहे.

Loading...
Advertisement

Punjab Election Result : पंजाबमध्ये दिग्गजांना झटका..! मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांचा पराभव..

Advertisement

LIVE Punjab Assembly Election Result 2022 : पंजाबी प्रदेशात सत्ताबदल..! ‘आप’ आहे इतक्या जोमात

Advertisement

Uttarakhand Election : उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्यांचा पराभव.. भाजपला पडलाय ‘हा’ मोठे संकट..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply