Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Punjab Election Result : पंजाबमध्ये दिग्गजांना झटका..! मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांचा पराभव..

दिल्ली : यंदा पंजाब विधानसभा निवडणूक दिग्गजांना जोरदार झटका देणारी ठरली आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पंजाबसारखे मोठे राज्य काँग्रेसने आता गमावलेच आहे. या राज्यात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने जबरदस्त कामगिरी करत विरोधी पक्षांचा दणदणीत पराभव केला आहे. इतकेच नाही तर या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा झटका बसला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पटियाला मतदारसंघातून पराभव झाला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांचा तर दोन मतदारसंघातून पराभव झाला आहे.

Advertisement

सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भदौर मतदारसंघातून पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा पराभव करणारे आम आदमी पक्षाचे उमेदवार लाभसिंह उगोके हे एका मोबाइल दुरुस्ती दुकानात काम करतात. पंजाब निवडणुकीतील हा सर्वात मोठा उलटफेर मानला जात आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये त्यांच्या दोन्ही जागांवर मागे पडले होते. त्यांनी स्वत:साठी सुरक्षित जागा म्हणून निवडलेल्या दोन्ही मतदारसंघात त्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचा ते चेहरा होते.

Advertisement

या मुद्द्यावर नवज्योतसिंग सिद्धू आणि चन्नी यांच्यात मतभेद झाले होते. अखेर काँग्रेस पक्ष नेतृत्वाने चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनवले होते. निवडणुकीच्या आधीपासून काँग्रेसमध्ये प्रचंड वाद सुरू होते. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपद आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षांतर्गत वाद आधिकच वाढले होते. त्याचा फटका काँग्रेसला बसल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading...
Advertisement

LIVE Punjab Assembly Election Result 2022 : पंजाबी प्रदेशात सत्ताबदल..! ‘आप’ आहे इतक्या जोमात

Advertisement

Exit Poll 2022 : पंजाबमध्ये ‘आम आदमी’ करणार कमाल; पहा, किती जागा मिळण्याची शक्यता..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply