Uttarakhand Elections : उत्तराखंडमध्ये काँग्रेसला जोरदार झटका..! मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार उमेदवाराचा पराभव..
दिल्ली : देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. पंजाबसारखे मोठे राज्यही काँग्रेस गमावणार हे आताच्या निवडणूक निकालांवरुन दिसून येत आहे. मणिपूरमध्ये सुद्धा काँग्रेसला जोरदार झटका बसला आहेत. मागील निवडणुकीत तब्बल 28 जागा जिंकणारा हा पक्ष आता फक्त 3 जागांवर आघाडीवर आहे. उत्तराखंडमध्येही काँग्रेसला फार काही करता आलेले नाही. आता या राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मतमोजणीत राज्याचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत पराभूत झाले आहे. त्यांना भाजप उमेदवाराकडून 4 हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
विधानसभेच्या ७० जागांवर काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आहेत. काँग्रेसला बहुमत मिळाले असते तर हरीश रावत हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार ठरले असते. उत्तराखंडसाठी काँग्रेसचे विशेष निरीक्षक मोहन प्रकाश यांनी विश्वास व्यक्त केला की त्यांच्या पक्षाला राज्यात पूर्ण बहुमत मिळेल आणि मुख्यमंत्रीपदासाठी निवडून आलेले आमदारच नाव ठरवतील. मात्र, राज्यात आता अशी परिस्थिती दिसत नाही. कारण, या राज्यातही भाजप बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर काँग्रेस मात्र चाचपडत आहे. माजी मुख्यमंत्री हरिश रावत आणि विरोधी पक्षनेते प्रीतम सिंह हे पक्षाचे दोन प्रमुख दावेदार होते.
दरम्यान, या राज्यात भाजप सध्या 48 जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेसने 18 जागांवर आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या आम आदमी पार्टीला मात्र येथे विशेष काही करता आलेले नाही. सध्याच्या परिस्थितीत पार्टीचा एकही उमेदवार आघाडीवर दिसत नाही. भाजपने येथे पुन्हा एकदा जोरदार कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश या राज्यांतही भाजपने जबरदस्त कामगिरी केली आहे. उत्तराखंडसह या तीन राज्यात आधीही भाजप सरकार होते. त्यानंतर यावेळी आतापर्यंत मिळत असलेल्या माहितीनुसार, या राज्यात भाजप आघाडीवर आहे.
Uttarakhand Exit Poll : उत्तराखंडमध्ये कोण मारणार बाजी ? ; पहा, काय सांगतोय निवडणूक अंदाज..
LIVE Uttrakhand Assembly Election Result 2022 : उत्तराखंडने दिलाय ‘त्या’ राजकीय पक्षाला कौल