Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Manipur Elections : भाजप करतोय बहुमताकडे वाटचाल; काँग्रेस मात्र कोमात.. पहा, किती जागांवर घेतलीय आघाडी..?

दिल्ली : मणिपूर विधानसभा निवडणुकीचे निकाल येत असून भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करत असल्याचे दिसत आहे. अंतिम निकालापर्यंत भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता नसली तरी भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, यात शंका नाही, असे जाणकारांचे मत आहे.

Advertisement

दुपारी 12.30 वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार 60 पैकी 41 जागांवर मतमोजणीचे निकाल हाती येत असून भाजप 22 जागांवर आघाडीवर आहे. सत्तेत भागीदार असलेला नॅशनल पीपल्स पार्टी आता एकटाच निवडणूक लढत असून 6 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला केवळ 3 जागा मिळाल्याचे दिसत आहे. यासह नागा पीपल्स फ्रंट 5 जागांवर आघाडीवर आहे. जनता दल (युनायटेड) 2 जागांवर विजयी होताना दिसत आहे. अशा स्थितीत काँग्रेस पक्ष राज्यातील तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा पक्ष बनू शकतो आणि प्रमुख विरोधी पक्षाचा दर्जाही हिरावून घेतला जाऊ शकतो.

Advertisement

वृत्तानुसार, मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे पी. सरचंद्र यांच्या तुलनेत आघाडीवर असून विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अद्याप अधिकृतपणे निकाल जाहीर झालेला नाही. 2017 च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत, काँग्रेस 60 पैकी 28 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. मात्र 21 जागा जिंकून भाजपला नॅशनल पीपल्स पार्टी, नागा पीपल्स फ्रंट आणि लोक जनशक्ती पार्टीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्यात यश आले होते. यावेळी मात्र काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट होताना दिसत आहे. यावेळी तर पक्ष सध्या फक्त 3 जागा मिळवताना दिसत आहे. अद्याप अंतिम निकाल हाती आलेले नाहीत. मात्र, यावेळी काँग्रेसला या राज्यात मोठे नुकसान होताना दिसत आहे.

Loading...
Advertisement

Manipur Assembly Election Result : मणिपूरमध्ये कोण आघाडीवर.. पहा, काय आहेत सुरुवातीचे अपडेट

Advertisement

LIVE Manipur Assembly Election Result 2022 : कॉंग्रेस पडली मागे..! भाजप आहे जोमात

Advertisement
Advertisement

Leave a Reply