Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

LIVE Assembly Election Result 2022 : मतमोजणी जोरात; पहा पाचही राज्यात काय कौल आहे मतदारांचा

देशातील उत्तर प्रदेश (Uttar pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), पंजाब (Punjab), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या पाच राज्यांमध्ये (5 States election update 2022) फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागा आहेत, तर उत्तराखंडमध्ये 70 जागा आहेत.

Please wait..

दिल्ली : देशातील उत्तर प्रदेश (Uttar pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), पंजाब (Punjab), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या पाच राज्यांमध्ये (5 States election update 2022) फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागा आहेत, तर उत्तराखंडमध्ये 70 जागा आहेत. याशिवाय पंजाबमधील 117, मणिपूरमधील 60 आणि गोव्यातील 40 विधानसभा जागांवर निवडणूक होत आहेत. आज सकाळी या राज्यांमधील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदान यंत्रात फेरफार करण्याच्या आरोपांमुळे ही निवडणूक गाजली आहे. अशावेळी कोणत्या राज्यात कोणता पक्ष सत्ता राखणं, कुठे सत्तांतर होणार किंवा कुठे वेगळेच चित्र दिसणार हे आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. (निवडणूक निकालाच्या ताज्या अपडेट पाहण्यासाठी ही लिंक वेळोवेळी रिफ्रेश करा)

Advertisement
उत्तरप्रदेश निवडणूक निकाल 2022 (एकूण जागा : 403 / सत्ता स्थापनेसाठी लागणारे संख्याबळ : 202)
राजकीय पार्टी / आघाडी जिंकलेल्या एकूण जागा जिंकण्याच्या शर्यतीतील जागा संख्या
भाजप + मित्रपक्ष 10 266
समाजवादी पार्टी + मित्रपक्ष 0 133
बहुजन समाज पार्टी 0 1
कॉंग्रेस 0 1
इतर / अपक्ष 0 2

मागील पार्श्वभूमी : उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ 14 मे 2022 रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत 14 मे पूर्वी विधानसभा आणि नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी-मार्च 2017 मध्ये झाल्या होत्या. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA 325 जागा जिंकून सत्तेवर आला आणि योगी आदित्यनाथ यांनी 19 मार्च 2017 रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सीएम योगी हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच वर्षे पूर्ण केली आहेत.

Advertisement
पंजाब निवडणूक निकाल 2022 (एकूण जागा : 117 / सत्ता स्थापनेसाठी लागणारे संख्याबळ 59)
राजकीय पार्टी / आघाडी जिंकलेल्या एकूण जागा जिंकण्याच्या शर्यतीतील जागा संख्या
कॉंग्रेस 4 14
भाजप + मित्रपक्ष 1 1
आप (आम आदमी पार्टी) 48 44
शिरोमणी अकाली दल 1 3
इतर / अपक्ष 1

मागील पार्श्वभूमी : पंजाब विधानसभेचा कार्यकाळ 27 मार्च 2022 रोजी संपत आहे. 117 जागा असलेल्या पंजाबमधील 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 77 जागा जिंकून दहा वर्षानंतर सत्तेत परतली, तर शिरोमणी अकाली दल-भाजप युती केवळ 18 जागांवर कमी झाली. आम आदमी पार्टी 20 जागा जिंकून प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री झाले, पण चार वर्षांनंतर काँग्रेसने कॅप्टन अमरिंदरच्या जागी चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केले. पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला 59 जागांचा आकडा गाठावा लागेल.

Advertisement
उत्तराखंड निवडणूक निकाल 2022 (एकूण जागा : 70 / सत्ता स्थापनेसाठी लागणारे संख्याबळ : 36)
राजकीय पार्टी / आघाडी जिंकलेल्या एकूण जागा जिंकण्याच्या शर्यतीतील जागा संख्या
भाजप + मित्रपक्ष 13 35
कॉंग्रेस 4 14
बहुजन समाज पार्टी
इतर / अपक्ष 0 4
Loading...

मागील पार्श्वभूमी : 70 जागांच्या उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ 23 मार्च रोजी संपत आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 57 जागा जिंकून प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले, तर विरोधी काँग्रेसला केवळ 11 जागा मिळाल्या. त्रिवेंद्रसिंग रावत मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना चार वर्षांनी हटवून भाजपने प्रथम तीरथसिंग रावत आणि त्यानंतर काही महिन्यांनी पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री केले.

Advertisement
गोवा निवडणूक निकाल 2022 (एकूण जागा : 40 / सत्ता स्थापनेसाठी लागणारे संख्याबळ : 21)
राजकीय पार्टी / आघाडी जिंकलेल्या एकूण जागा जिंकण्याच्या शर्यतीतील जागा संख्या
भाजप 9 10
कॉंग्रेस + मित्रपक्ष 4 8
महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी
तृणमूल कॉंग्रेस 1 2
आप (आम आदमी पार्टी) 1 1
इतर / अपक्ष 2 2

मागील पार्श्वभूमी : 40 जागांच्या गोवा विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च रोजी संपत आहे. राज्यातील शेवटच्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी 2017 मध्ये झाल्या होत्या. 15 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, पण सरकार स्थापन करू शकला नाही. भाजपने 13 जागा जिंकल्या आणि MGP, GFP आणि दोन अपक्ष आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात यश मिळवले. मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले, परंतु 17 मार्च 2019 रोजी मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले.

Advertisement
मणिपूर निवडणूक निकाल 2022 (एकूण जागा : 60 / सत्ता स्थापनेसाठी लागणारे संख्याबळ : 31)
राजकीय पार्टी / आघाडी जिंकलेल्या एकूण जागा जिंकण्याच्या शर्यतीतील जागा संख्या
कॉंग्रेस 3 2
भाजप + मित्रपक्ष 13 19
नॅशनल पीपल्स पार्टी (NPP)
नागा पीपल्स फ्रंट (NPF)
इतर / अपक्ष 9 14

मागील पार्श्वभूमी : ईशान्येकडील 60 जागांचे राज्य असलेल्या मणिपूरच्या विधानसभेचा कार्यकाळ 19 मार्च 2022 रोजी संपत आहे. अशा स्थितीत त्यापूर्वी राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 2017 च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत, भाजप 24 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. 17 आमदारांसह काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष ठरला. भाजपने एनपीपी, एलजेपी आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आणि एन बिरेंदर सिंग राज्याचे मुख्यमंत्री झाले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply