Election 2022 : .. म्हणून काँग्रेसला वाटतेय ‘त्याची’ भीती.. गोव्यातील उमेदवारांबाबत घेतलाय ‘हा’ निर्णय..
मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत यंदा कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज एक्झिट पोलद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर आता या लहान राज्यात राजकीय घडामोडी अतिशय वेगाने घडू लागल्या आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कालच दिल्लीला रवाना झाले आहेत. बहुमत मिळाल नाही तर महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे सहकार्य घेण्यासाठी चर्चाही सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसही सतर्क आहे. कारण, याआधी काँग्रेसला जास्त जागा मिळालेल्या असतानाही त्यांना सरकार स्थापन करता आले नव्हते. यावेळी मात्र असे होऊ नये, यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते काळजी घेत आहेत.
यावेळी निकाल येण्याआधीच काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना हॉटेलमध्ये नेल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी काँग्रेस कोणतीही जोखीम स्वीकारण्याच्या मानसिकतेत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, काही पक्ष काँग्रेस नेत्यांना त्यांच्या पक्षात सामील करतील, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे. मागील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरुनही काँग्रेसला गोव्यात सरकार स्थापन करता आले नाही. हा अनुभव पाठीशी असल्याने काँग्रेस नेते यंदा अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेताना दिसत आहेत. काल अनेक एक्झिट पोलमध्ये गोव्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सांगितले की, भाजपला जर बहुमत मिळाले नाही तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा (एमजीपी) पाठिंबा मिळवण्यासाठी केंद्रीय नेतृत्व चर्चा करत आहे. गोव्यात 40 सदस्यीय विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान झाले असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, भाजपला 21 जागांच्या बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागा मिळतील अशी आशा आहे. परंतु जर संख्या कमी पडली तर “पक्षाने अपक्ष आणि एमजीपीकडून पाठिंबा मिळविण्याचा पर्यायही खुला ठेवला आहे.” पार्टीचे केंद्रीय नेतृत्व निवडणुकोत्तर आघाडीसाठी एमजीपी बरोबर चर्चा करत आहे.
गोव्यात राजकीय घडामोडी जोरात..! बहुमत मिळाले नाही तर काय..? ; भाजपने तयार केलाय हा प्लान..
Goa Exit Poll : गोव्यात भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर.. पहा, कुणाला किती जागा मिळण्याची शक्यता..