मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सांगितले की, भाजपला जर बहुमत मिळाले नाही तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा (एमजीपी) पाठिंबा मिळवण्यासाठी केंद्रीय नेतृत्व चर्चा करत आहे. गोव्यात 40 सदस्यीय विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान झाले असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, भाजपला 21 जागांच्या बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागा मिळतील अशी आशा आहे. परंतु जर संख्या कमी पडली तर “पक्षाने अपक्ष आणि एमजीपीकडून पाठिंबा मिळविण्याचा पर्यायही खुला ठेवला आहे.” पार्टीचे केंद्रीय नेतृत्व निवडणुकोत्तर आघाडीसाठी एमजीपी बरोबर चर्चा करत आहे.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 17 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. परंतु 13 जागा जिंकणाऱ्या भाजपने MGP, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्ष यांच्याबरोबर आघाडी करून मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. सन 2019 मध्ये प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले तेव्हा महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते. यावेळी एमजीपीने तृणमूल काँग्रेसबरोबर आघाडी केली आहे. गोवा निवडणुकीच्या निकालानंतर टीएमसीला विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेईल परंतु प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री म्हणून कधीही समर्थन देणार नाही, असे आमदार सुदिन ढवळीकर म्हणाले होते.
सध्या सावंत केंद्रीय नेतृत्वाची भेट घेण्यासाठी पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. त्रिशंकू विधानसभेच्या शक्यतेवर चर्चा करण्यासाठी ते आज भाजप केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की प्रमोद सावंत आणि केंद्रीय नेतृत्व यांच्यातील चर्चेत भाजप बहुमताच्या तुलनेत अर्धा टप्पा पार करण्याचे मार्ग शोधण्यावर केंद्रित आहे.
Uttar Pradesh Exit Poll : यंदा उत्तर प्रदेशात कुणाचे सरकार..? ; पहा, काय आहे निवडणूक अंदाज..?
Goa Exit Poll : गोव्यात भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर.. पहा, कुणाला किती जागा मिळण्याची शक्यता..