Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

West Bengal : बंगालमध्ये भाजपला आणखी एक झटका.. पहा, आता काय घडलेय राज्याच्या राजकारणात..?

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला या राज्यात सातत्याने धक्के बसत आहेत. निवडणुकीनंतर आतापर्यंत अनेक नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. आताही पुन्हा एकदा भाजपला जोरदार झटका बसला आहे. बंगाल भाजप माजी उपाध्यक्ष आणि निलंबित नेते जयप्रकाश मजुमदार टीएमसीच्या राज्य समितीच्या बैठकीत उपस्थित राहत तृणमूल कांग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या राजकीय घडामोडींमुळे केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे टेन्शन मात्र वाढणार आहे.

Advertisement

पक्षविरोधी कारवायांमुळे, भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगाल युनिटने त्यांच्या दोन नेत्यांना पक्षातून काढून टाकले होते. त्यात जयप्रकाश मजुमदार यांचाही समावेश होता. हे लोक पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. एक महिन्याआधी जयप्रकाश यांना पार्टीच्या नव्या समितीचे प्रवक्ते बनवण्यात आले होते. मात्र रितेश तिवारींचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला नव्हता. सुमारे आठवडाभराआधी कोलकाता येथे जय प्रकाश आणि रितेश यांनी केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर यांच्या पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती. तेव्हापासून त्यांना निलंबित करण्यात आले होते.

Advertisement

पक्षातून निलंबन झाल्यापासून ते सातत्याने बंगाल भाजप नेत्यांना लक्ष्य करत होते आणि प्रदेश नेतृत्वावर टीका करत होते. पक्ष नेतृत्वाविरोधात ते सातत्याने आवाज उठवत होते. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पक्ष नेतृत्वावर जोरदार टीका झाली. तेव्हापासून ते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा होती.

Loading...
Advertisement

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपासून भाजपमधील अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे. पक्षाचे काही नेतेही पक्ष नेतृत्वाविरोधात टीका करत आहेत. पक्षाविरोधात सातत्याने टीका करत असल्याने जयप्रकाश मजुमदार यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ते लवकरच टीएमसी मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत होते. अखेर आज त्यांनी आधिकृतपणे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Advertisement

बंगालमध्ये भाजपला पुन्हा जोरदार झटका..! सत्ताधारी तृणमूलने मिळवला शानदार विजय; पहा, किती नगरपालिका जिंकल्या..?

Advertisement

बंगालमध्ये भाजपला आणखी एक झटका..! ‘त्या’ समस्येला रोखण्यात भाजप ठरतोय अपयशी; पहा, आता काय घडलेय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply