Goa Exit Poll : गोव्यात भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर.. पहा, कुणाला किती जागा मिळण्याची शक्यता..
मुंबई : उत्तर प्रदेशातील मतदानाच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर, सर्व एक्झिट पोलचे निकाल समोर येत आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरसह पाच राज्यांमध्ये मतदान झाल्यानंतर 10 मार्चला निकाल जाहीर होणार आहेत. गोव्यातील एक्झिट पोलचे निकाल खऱ्या निकालाआधी आले आहेत. सध्या या राज्यात भाजप सत्तेत आहे, मात्र यावेळी काँग्रेसही जोरदार टक्कर देताना दिसत आहे.
आज तकच्या एक्झिट पोलनुसार गोव्यात भाजपला सर्वाधिक 33 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 32 टक्के मते मिळू शकतात. 40 विधानसभेच्या जागा असलेल्या या राज्यात भाजपला 14-18 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 15 ते 20 जागा मिळू शकतात. तसेच MGP 2-5 आणि अन्य पक्षांनी 0 ते 4 अशा जागा मिळू शकतात.
एबीपी न्यूज सी वोटरच्या एक्झिट पोलनुसारस भाजपा 12 ते 16, काँग्रेस 13 ते 17, आम आदमी पार्टी 1 ते 5, MGP 5-9 आणि अन्य पक्षांना 0 ते 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
इंडिया टीव्ही सीएनएक्स गोवा एक्झिट पोलनुसार, भाजप गोव्यात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करू शकते. इंडिया टीव्ही गोवा एक्झिट पोलमध्ये भाजपला 32 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय काँग्रेसची मते 29 टक्के राहण्याचा अंदाज आहे. India TV CNX च्या EXIT POLL मध्ये काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी आघाडीला 29% मते मिळत आहेत. MGF आणि TMC युतीला 12%, आम आदमी पार्टीला 14% आणि इतरांना 13% मते मिळू शकतात. या एक्झिट पोलनुसार, भाजपा 16 ते 22, कांग्रेस 11 ते 17, MGP 1-2, आम आदमी पार्टी 0 ते 2 तर अन्य पक्षांना 4 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
या निवडणुकीत एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेस सर्वात मोठा ठरताना दिसत आहे. मात्र, कुणालाही बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. या निवडणुकीत टीएमसी आणि आप देखील असल्याने भाजपला फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर त्रिशंकू परिस्थिती राहिल्यास महाराष्ट्र गोमांतकवादी पक्ष निर्णायक ठरण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
Exit Poll 2022 : पंजाबमध्ये ‘आम आदमी’ करणार कमाल; पहा, किती जागा मिळण्याची शक्यता..?
Uttarakhand Exit Poll : उत्तराखंडमध्ये कोण मारणार बाजी ? ; पहा, काय सांगतोय निवडणूक अंदाज..