दिल्ली : देशातील 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान सोमवारी संपले. त्यानंतर 10 मार्च रोजी निवडणुकांचे आधिकृत निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, त्याआधी निवडणूक निकालांचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उत्तराखंड राज्याबाबतही एक्झिट पोल समोर आले आहेत. TV9 वृत्तवाहिनीच्या एक्झिट पोलनुसार, उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. मात्र या लढतीत काँग्रेसच आघाडीवर असल्याचे दिसत आहे. काँग्रेसला 33-35 जागांवर विजय मिळू शकतो. जे बहुमतापेक्षा एक जागा कमी आहे. काँग्रेसला जवळपास 41.8 टक्के मते मिळू शकतात.
त्याचवेळी, एक्झिट पोलनुसार, सत्ताधारी भाजप दुसऱ्या क्रमांकावर असू शकतो, ज्याला 31-33 जागा मिळण्याची शक्यता आहे. येथे भारतीय जनता पार्टीच्या मतदानाचा वाटा 39.9 टक्के असू शकतो. म्हणजेच भाजप पूर्ण बहुमताचे सरकार बनवण्यापासून दूर दिसत आहे. त्याचवेळी, उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या आम आदमी पक्षाला 0-3 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर मतदानाच्या टक्केवारीबाबत सांगितले तर आम आदमी पार्टीला 5.3 टक्के मते मिळू शकतात. त्यानुसार उत्तराखंडमधील लढत तिरंगी आहे. तर इतरांना 0-2 जागा मिळू शकतात.
एक्झिट पोलनुसार, उत्तराखंडमध्ये कोणताही पक्ष सरकार स्थापन करताना दिसत नाही. कोणत्याही पक्षाला 36 जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत अपक्ष आणि आम आदमी पक्ष सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. काँग्रेसला केवळ एका जागेवर सरकार स्थापन करता आले नाही आणि आम आदमी पक्षाला एका जागेवर यश मिळाले, तर दोन्ही पक्ष आघाडी करून सरकार स्थापन करतील. याआधी दिल्लीतही आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी करून सरकार स्थापन केले होते. अपक्ष आमदार विजयी झाल्यास काँग्रेसचाही पाठिंबा मिळू शकतो.
उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. या सर्व 70 विधानसभा जागांवर दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे प्रमुख पक्ष आहेत. आम आदमी पक्षाने जनतेला आकर्षित करण्यासाठी मोफत विजेसह अनेक मोठमोठी आश्वासने दिली, परंतु जनतेला त्यांची आश्वासने आवडली नसल्याचे एक्झिट पोलवरून दिसते.
दरम्यान, एबीपी न्यूज सी व्होटर एक्झिट पोलनुसार, उत्तराखंडमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करत असल्याचे दिसत आहे. सध्या या राज्यात भाजप सत्तेत आहे. यावेळी भाजपला फटका बसताना दिसत आहे. काही एक्झिट पोलमध्ये मात्र कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणा नाही, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Exit Poll 2022 : पंजाबमध्ये ‘आम आदमी’ करणार कमाल; पहा, किती जागा मिळण्याची शक्यता..?