Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून इतके भारतीय बनलेत विदेशी नागरिक; केंद्र सरकारने सांगितले खरे कारण; तुम्हीही जाणून घ्या..

दिल्ली : विदेशात राहण्याची तेथे स्थायिक होण्याची कुणाची इच्छा नसते. जगातील लोक रोजगार किंवा अन्य कारणांनिमित्त दुसऱ्या देशात स्थायिक होतात. काही जण पुन्हा मायदेशी परततात. तर काही जण मात्र त्याच देशाचे नागरिक होतात. भारतातूनही दरवर्षी हजारो लोक शिक्षण आणि रोजगारानिमित्त विदेशात जातात. मागील 5 वर्षांच्या काळात देशातील 6 लाखांपेक्षा जास्त लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. हे नागरिक आता विदेशात स्थायिक झाले असून त्यांनी त्या देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

Advertisement

मात्र, या लोकांनी विदेशी नागरिकत्व का स्वीकारले, याचे कारण त्यावेळी सरकारने दिले नव्हते. आता मात्र, या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. या लोकांनी त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे भारताचे नागरिकत्व सोडले आहे, असे उत्तर विदेश मंत्रालयाने दिले आहे. संसद आधिवेशना दरम्यान काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नास उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

Advertisement

वास्तविक, डिसेंबरमध्ये संसदेच्या अधिवेशनादरम्यान दिग्विजय सिंह यांनी सन 2017 पासून किती भारतीय नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व घेतले आहे आणि ज्या देशांचे नागरिकत्व भारतीय नागरिकांनी घेतले आहे त्यांची नावे काय आहेत, अशी विचारणा केली होती. यावर परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आणि आतापर्यंत किती भारतीय नागरिकांनी नागरिकत्व सोडले हे सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2017 पासून आतापर्यंत 6,08,162 भारतीय नागरिकांनी आपले नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व घेतले आहे. तसेच, मंत्रालयाने सांगितले की, ‘या व्यक्तींनी त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे भारतीय नागरिकत्व सोडले आहे.

Loading...
Advertisement

2017 ते 2021 या काळात भारतीय नागरिकत्व सोडलेल्या लोकांबद्दल सांगितले तर 2017 मध्ये 1,33,049, 2018 मध्ये 1,34,561, 2019 मध्ये 1,44,017, 2019 मध्ये 85,248 आणि 2020 मध्ये 1,11,287 जण परदेशी झाले आहेत. भारतानंतर इतर देशांचे नागरिकत्व घेतलेल्या लोकांनी अमेरिकेला सर्वाधिक पसंती दिली आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन, कॅनडा या देशांचा समावेश आहे.

Advertisement

भारतीयांना विदेशांची भुरळ..! 5 वर्षात ‘इतके’ भारतीय बनले विदेशी नागरिक; पहा, केंद्र सरकारने नेमके काय म्हटलेय..?

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply