राहुल गांधी म्हणतात, पंतप्रधान मोदी, केजरीवाल यांची भाषणे ऐका; पण, का ?.. जाणून घ्या, नेमके कारण
दिल्ली : पंजाबमध्ये आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली. आज राहुल गांधींनी राजपुरा येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींसह अकाली दल आणि आम आदमी पक्षावरही त्यांनी जोरदार टीका केली. दरम्यान, राहुल यांनीही मंचावरून असे काही वक्तव्य केले ज्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
राहुल गांधी म्हणाले, की ‘पंजाबमध्ये निवडणूक आहे. भाजप, आम आदमी पार्टी, अकाली दलाचे लोक मोठमोठी आश्वासने देत आहेत. मला आठवते 2014 मध्ये नरेंद्र मोदीजी येथे यायचे आणि मग म्हणायचे की मी दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देईन. मी बँक खात्यात 15 लाख रुपये टाकेन. आता मात्र तसे काही म्हणत नाही. आता पंजाबमध्ये आल्यावर ते रोजगाराबद्दल बोलत नाहीत. काळा पैसा नष्ट करण्याबाबत बोलत नाही. आता वेगळेच मुद्दे उपस्थित करत आहेत. अरे भाऊ तुमचे सरकार येणार नाही. वेळ का घालवता ?
राहुल गांधी म्हणाले, मी जे काही सांगतो ते विचारपूर्वक सांगत असतो. तुम्हाला ते चांगले वाटो किंवा वाईट वाटो. मी या व्यासपीठावरून खोटी आश्वासने देणार नाही. तुम्ही मला 24 तास खोटी आश्वासने देण्यास सांगितले तरी मी तसे करणार नाही. मला त्यात रसही नाही. बरेच लोक तुम्हाला खोटी आश्वासने देतील. खोटी आश्वासने ऐकायची असतील तर तुम्ही पंतप्रधान मोदी, सुखबीर सिंग बादल आणि अरविंद केजरीवाल यांची भाषणे ऐका. मला फक्त सत्य बोलायला शिकवले गेले आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांवर टीका केली.
दरम्यान, 5 राज्यांच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर उत्तराखंड आणि गोवा राज्यात काल एकाच टप्प्यात सर्व जागांसाठी मतदान झाले. त्यानंतर पंजाब विधानसभेच्या सर्व 117 जागांसाठी 20 फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे या राज्यात जोरदार प्रचार सुरू आहे. काल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली.
ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का..! ‘या’ दिग्गज नेत्याने दिला राजीनामा; जाणून घ्या, काय आहे कारण