Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांना मोफत वीज.. होळी दिवाळीला गॅस टाकी सुद्धा मोफत.. पहा, कुणी पाडलाय आश्वासनांचा पाऊस

दिल्ली : भारतीय जनता पार्टीने ‘लोक कल्याण संकल्प पत्र’ नावाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका 2022 साठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपने संकल्पपत्रात शेतकरी आणि तरुणांसाठी अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. मंगळवारी गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.

Advertisement

भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे की, राज्यामध्ये पुन्हा सरकार आले तर येत्या 5 वर्षांत शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज दिली जाईल. 5 हजार कोटी रुपये खर्चाची मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ज्या अंतर्गत सर्व लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना बोअरवेल, कूपनलिका, तलाव आणि टाकी बांधण्यासाठी अनुदान दिले जाईल.

Advertisement

बजेट म्हणजे काय रे भाऊ..? भाजप देणार ‘या’ प्रश्नाचे उत्तर; पहा, ‘त्यासाठी’ काय आहे देशव्यापी प्लान..?

Advertisement

खरेदिवाला म्हणजे ऑफरवाला. https://bit.ly/3gpEvq9 यावर क्लिक करून करा खरेदी दणक्यात..!

Advertisement

.. म्हणून आता लोकांनी भाजपला मतदान करू नये.. पहा, लोकांना कुणी केलेय ‘हे’ आवाहन

Advertisement

येत्या 5 वर्षात प्रत्येक कुटुंबाला किमान रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. राज्यातील सर्व विभागीय रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद युवा शक्तीकरण योजनेंतर्गत 2 कोटी टॅबलेट किंवा स्मार्टफोन वितरित करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये व्यायामशाळा व क्रीडांगणे उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था पहिल्या क्रमांकावर आणण्याचे आश्वासन देत प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न दुप्पट करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे.

Advertisement

भाजप सरकार आल्यास 5 वर्षात राज्यात 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.राज्यात पुन्हा सरकार आल्यास मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेतील आर्थिक मदत 15 हजारांवरून 25 हजारांपर्यंत वाढ करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत, सर्व लाभार्थ्यांना होळी आणि दीपावलीच्या दिवशी मोफत LPG सिलिंडर दिले जातील. 60 वर्षांवरील महिलांसाठी सार्वजनिक वाहतुकीत मोफत प्रवासाची व्यवस्था केली जाईल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply