मुंबई : क्रिकेट रसिकांसाठी मोठी बातमी आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या आगामी वन-डे व टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेद्वारे नवा कॅप्टन रोहित शर्मा याचे पुनरागमन झाले आहे.
आगामी काळातील टी-20 आणि वन-डे वर्ल्ड कपचा विचार करीत नवी टीम तयार करण्यावर कॅप्टन रोहित शर्मा (Rohit sharma) आणि कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा भर असल्याचे दिसते. त्याचे संकेत या टीममधून मिळत आहेत. त्यामध्ये रवी बिष्णोई व दीपक हुडा यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.
टी-20 टीममध्ये लेग स्पीनर युजवेंद्र चहलचा समावेश करण्यात आलाय. यापूर्वी 2021 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये युजवेंद्र चहलच्या जागी राहुल चहरचा समावेश करण्यात आला होता. मात्र, आता त्याला वगळण्यात आलंय. चहरची जागा रवी बिष्णोई याने घेतली आहे.
ऑफ स्पिनर म्हणून वॉशिंग्टन सुंदरला पहिली पसंती देण्यात आलीय.. तसेच तो दमदार बॅटींग देखील करतो. सुंदरकडे पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करण्याचा अनुभव असून, अश्विनच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली आहे. त्यांच्या गैरहजेरीत मोहम्मद सिराज व आवेश खान यांच्यावर फास्ट बॉलिंगची धुरा असेल. शार्दूल ठाकूर व दीपक चहर हे ऑल राऊंडर म्हणून टीममध्ये आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षल पटेल यांचाही टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
भारताची वन-डे टीम : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान
भारताची टी20 टीम : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.
कोरोना अपडेट : तामिळनाडू, महाराष्ट्राने वाढविले टेंशन
IND vs WI: रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट, जाणुन घ्या वेस्ट इंडिजविरुद्ध कोण करणार संघाचा नेतृत्व