Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Election 2022 : अखेर भाजपने ‘त्यांना’ तिकीट नाकारले; गोव्यात घोषित केले 34 उमेदवार

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या 34 उमेदवारांची घोषणा केली आहे. राज्यातील एकूण 40 जागांपैकी केवळ 6 उमेदवारांचा निर्णय होणे बाकी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षाने पणजी मतदारसंघातून अटान्सियो मोन्सेराते यांना तिकीट दिले आहे. या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर तिकीट मागत होते. मात्र, भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पर्रीकर आता कोणता निर्णय घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

पक्षाकडून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्पल पर्रीकर यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमच्या बाजूने त्यांना दोन जागांचा पर्याय देण्यात आला होता. त्यापैकी एक त्यांनी नाकारला आहे आणि दुसऱ्या पर्यायावर चर्चा सुरू आहे. आम्हाला अपेक्षित आहे की ते सहमत होतील.

Advertisement

अलीकडेच दिल्लीतील अनेक नेत्यांनी उत्पल पर्रीकर यांच्याशी संपर्क साधून अन्य पर्यायांचा विचार करण्यास सांगितले होते. पणजी मतदारसंघा व्यतिरिक्त ते कोठूनही लढू शकतात, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. याशिवाय त्यांना भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीत सहभागी होण्याची ऑफरही देण्यात आली आहे. भाजपने ज्या 34 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत त्यापैकी 9 अल्पसंख्याक समाजाचे आहेत. भाजपने सैंकलिम मतदारसंघातून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांची घोषणा करताना गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पक्षाने गेल्या 10 वर्षात राज्याला विकासाच्या दिशेने नेले आहे.

Loading...
Advertisement

राज्यात पुन्हा एकदा भाजप विजय होईल, असे ते म्हणाले. 40 जागांच्या गोवा विधानसभेसाठी 14 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गोव्यात तृणमूल काँग्रेस शून्य आहे. याशिवाय आम आदमी पक्षावर टीका करताना फडणवीस म्हणाले की, गोव्यातील जनता त्याला नाकारेल. गोव्यात सर्वसाधारणपणे राष्ट्रवादी गोमंतक पक्ष, भाजप आणि काँग्रेस यांच्यात सामना होणार आहे. मात्र या निवडणुकीत टीएमसी आणि आम आदमी पक्षाच्या प्रवेशामुळे राष्ट्रीय पक्षांसमोरील आव्हान वाढले आहे.

Advertisement

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला जोरदार झटका; ‘त्या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश..

Advertisement
Advertisement

Leave a Reply