Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. म्हणून झाला भारताचा स्वप्नभंग; पहा कोणत्या खेळाडूपुढे हरला स्टार संघ

मुंबई – तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) भारतावर (India) 7 गडी राखून विजय प्राप्त केला. याच बरोबर इतिहासात पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी मालिका (Test series) जिंकण्याचे  भारताचा स्वप्न भंग (Dream break) झाले . (India’s dream of winning a Test series in Africa was shattered when the player turned the match around)
विजयासाठी भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्षाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात रासी व्हॅन डर डुसेनने 95 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या तर टेंबा बावुमा 58 चेंडूत 32 धावा करून नाबाद राहिला. भारताकडून बुमराह, शमी आणि शार्दुलने 1-1 विकेट घेतले. कीगन पीटर्सने दक्षिण आफ्रिकेसाठी 82 धावांची मॅच विनिंग इनिंग खेळली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकाही 2-1 ने  खिशात घातली. मालिकेचा पहिला कसोटी सामना भारताने जिंकला होता त्यांनतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दोन्ही कसोटी सामने जिंकून मालिका जिंकली आहे.
हा विजय दक्षिण आफ्रिकेसाठी ही खास आहे कारण हा संघ कमकुवत मानला जात होता. दक्षिण आफ्रिकेच्या संघात नवीन खेळाडू उपस्थित होते आणि त्यांचा कर्णधारही नवीन होता. त्याचबरोबर कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघात एकापेक्षा जास्त स्टार खेळाडू उपस्थित होते. असे असतानाही दक्षिण आफ्रिकेच्या संघातील युवा खेळाडूंनी भारताला ही मालिका जिंकू दिली आहे.

Loading...
Advertisement

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकेने 2 बाद 101 धावा केल्या होत्या. कीगन पीटरसन 61 चेंडूत 48 धावा करून नाबाद होता. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी बुमराहने डीन एल्गरला बाद करून आफ्रिकन संघाला मोठा धक्का दिला होता त्याला 30 धावावर बुमराहने बाद केला होता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply